आय.एम.आर.टी.मध्ये वाड्:मय चौर्य या विषयावर कार्यशाळा संपन्न
आय.एम.आर.टी.मध्ये वाड्:मय चौर्य या विषयावर कार्यशाळा संपन्न
नाशिक प्रतिनिधी
मविप्रच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आय.एम.आर.टी.) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व आय एम आर टी यांच्या संयुक्त विद्यमाने वाडमय चौर्य रोखण्यासाठी नाशिक मधील सर्व पीएचडी मार्गदर्शक, संशोधक यांच्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, दूरदृष प्रणाली द्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि पुणे विद्यापीठाच्या आय टी व survillance सेल चे प्रमुख प्रा. अंकुश कुलकर्णी हे उपस्थित होते.
या कार्यशाळेसाठी नासिक मधील 120 विविध संस्थांचे प्राचार्य, पीएचडी मार्गदर्शक यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली होती त्यापैकी जवळपास 80 मार्गदर्शकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
अध्यक्ष स्थानावरून ॲड.नितीन ठाकरे म्हणाले की ‘ काळानुरूप व्यवस्थेमध्ये बदल होत जाणार असून आपले साहित्य जागतिक दर्जाचे व्हावे यासाठी पीएचडी मार्गदर्शक व संशोधक विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे भविष्यामध्ये संस्थेची सुद्धा स्वतःची वाड्मयीन बखर तयार होणे गरजेचे आहे म्हणजेच ते ज्ञान सर्व विद्यार्थी समाज व संशोधक यांना वापर करता येईल.
विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ पराग काळकर यांनी दूर दृश्य प्रणाली द्वारे सर्व मार्गदर्शकांना संबोधित केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक अंकुश कुलकर्णी यांनी “ड्रिलबिट एक्स्ट्रीम प्लेगरिझम सॉफ्टवेअर” याबद्दल माहिती सांगितली ते वापरण्याबद्दल विद्यापीठाचा उद्देश व त्याचे फायदे विशद केले. तदनंतर दुपारच्या सत्र मध्ये त्यांनी ड्रिलबिट (drillbit), उरकुंड (urkund) आणि Turnitin या सॉफ्टवेअर मधील फरक व वापरण्याच्या पद्धती यावरती प्रात्यक्षिक घेऊन मार्गदर्शन केले.
आय एम आर टी चे संचालक डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी कार्यशाळा आयोजित करण्यामागचा हेतू सांगितला.
सर्व संशोधक मार्गदर्शकांना कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर लगेचच प्रमाणपत्रे देण्यात आली.
या कार्यक्रमाचे समन्वय प्रा.डॉ. गिरीश अहिरे व प्रा. डॉ. संजय गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक अनुजा पाटील यांनी केले.