ताज्या घडामोडीसामाजिक

*सिन्नर नगरपरीषदेतर्फे स्वीप उपक्रम अंतर्गत मतदान जन जागृती अभियान


*सिन्नर नगरपरीषदेतर्फे स्वीप उपक्रम अंतर्गत मतदान जन जागृती अभियान*

सिन्नर प्रतिनिधी 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ स्वीप उपक्रम अंतर्गत उत्सव लोकशाहीचा अभिमान देशाचा या संकल्पनेतून मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक यांचे आदेशान्वये आज दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी सिन्नर नगरपरिषद द्वारे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

 

सिन्नर नगरपरिषद कार्यालयापासून वावी वेस, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणेश पेठ, नेहरू चौक, महात्मा ज्योतिबा फुले बस स्थानक या ठिकाणी जनजागृती रॅली, पथनाट्य, माहिती फलकांच्या द्वारे नागरिकांना निःपक्षपाती, निर्भीडपणे मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावणे बाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो”, “आपल्या मताचे दान, लोकशाहीची शान”, “वाढवू तिरंग्याच्या शान, करुया देशासाठी मतदान”, “मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा” अशा घोषणा देत सिन्नर शहरातील विविध भागात नागरिकांत जनजागृती करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी रितेश बैरागी, प्राचार्य पी. व्ही. रसाळ, सिन्नर बस स्थानक आगर प्रमुख हेमंत नेरकर, आगर व्यवस्थापक भारत शेळके, उपमुख्याधिकारी दीपक बंगाळ, शहर

Advertisement

अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख, विद्युत अभियंता प्रमोद पाटील, बांधकाम अभियंता सौरभ गायकवाड, कर अधिकारी योगेश मुळे, सहाय्यक नगररचनाकार सुधाकर दराडे, संगणक अभियंता अभितोष सांगळे, कैलास चव्हाण, सौफिया बागल, हेमलता दसरे, राहुल मुंगसे, यांचेसह जी.एम.डी. आर्ट्स, बी. डब्ल्यू. कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे उपप्राचार्य राजेंद्र पवार, प्रा. राजेंद्र आगवणे, प्रा.जावेद शेख, प्रा. अरुण पोटे, प्रा.आर.टी.सोनवणे, यांचेसह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते. तसेच निवृत्ती चव्हाण, मंगेश आहेर, विजय वाजे, कैलास शिंगोटे, जावेद सय्यद, हसन शेख, अर्फात अत्तार, कैलास झगडे, कल्पेश उगले, राहुल आहिरे, सचिन वारुंगसे, ज्ञानेश्वर घेगडमल, ताहीर शेख, गणेश गुंजाळ, गोरख वाघ, शैलजा जाधव, वैशाली जाधव यांचे सह सिन्नर नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच विद्या सोनवणे, निशा कापुरे, छाया देशमुख, शुभांगी उकाडे, सुनिता पाबळे, प्रतिभा भाटजिरे, रेखा शिंदे यांचेसह महिला बचत गट सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *