क्राईम

अश्विनी पुरी उत्कृष्ट निवेदक उपसंपादक पुरस्काराने सन्मानित; जिद्द, चिकाटीने मिळवले यश 


अश्विनी पुरी उत्कृष्ट निवेदक उपसंपादक पुरस्काराने सन्मानित

जिद्द, चिकाटीने मिळवले यश 

Advertisement
संगमनेर :प्रतिनिधी
 वृत्तनिवेदिका अश्विनी पुरी यांना नाशिक येथे उत्कृष्ट निवेदिका व उपसंपादिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागातील बिरेवाडी या ग्रामीण भागातील  शैक्षणिक संस्कार घेऊन नाशिकसारख्या महानगरातील स्पर्धेला तोंड देत अश्विनीने हे यश संपादन केल्याने नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या उमेदवारांसाठी हा पुरस्कार प्रोत्साहित करणारा ठरणार आहे.
अश्विनी पुरी यांचा पत्रकारितेचा प्रवास :
वेध न्युज सुरूवात
नाशिक न्युज अंकर्रिंग
न्युज इंडिया मराठी वृत्तनिवेदिका तथा उपसंपादिका
नाशिक सुपरफास्ट अँकर
उत्तर महाराष्ट्र टाइम्स उपसंपादीका
2023 ला नाशिकच्या कालिका देवी मंदिर संस्थांनककडून राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार प्राप्त
भोसला मिलिटरी कॉलेजमधून श्रीकृष्ण कुलकर्णी व लोकेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय वृत्तवाहिनी न्युज नेशन दिल्ली येथे वृत्तनिवेदिका म्हणून निवड
भोसला मिलिटरी कॉलेज श्रीकृष्ण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन & journalism final
हे सर्व करत असताना मराठी लघुलेखन वेग मर्यादा १२० व इंग्रजी लघुलेखन वेग मर्यादा 80 श.प्र.मी complete
 7ते 8 महिन्यांपूर्वी संगमनेर तालुक्यात DSnews24 या वृत्तवाहिनीची नव्यानेच मुहूर्तमेढ रोवत कार्यभार सुरु
नाशिकमधील विवीध वृत्तवाहिनीचे voiceover काम आणि वार्तांकन…
 नाथपंथी गोसावी समाजाचे नाशिक महिला जिल्हाध्यक्षा पदाची जबाबदारी 2023 पासून आजतगायत त्यांच्या खांद्यावर आहे.
  वृत्तलेखन कौशल्य म्हणून  उपसंपादक आणि स्वर उच्चार,स्पष्टता तसेच शब्दभाव, मधुर आवाजासाठी उत्कृष्ट निवेदिका म्हणून   निफाड दर्पण राज्यस्तरीय २०२४ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. कोणत्याही क्षेत्रात अचूक निर्णय घेऊन  पाऊल टाकून निर्णय घेतला की यश हमखास मिळते, त्यासाठी वयाचे बंधन नसून जिद्द, चिकाटी आणि धाडस जिगर निर्भीडपणा हे गुण महत्वाचे असतात हेच अश्विनीने या पुरस्कारातून दाखवून दिले आहे.या पुरस्काराबद्दल अश्विनी पुरी यांचे  नाशिक, अहमदनगर, संगमनेर, साकुर पंचक्रोशितून  क्षेत्रात  अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *