केंद्रीय मंत्री ना.आठवले यांच्या संगमनेरच्या सभेने वाढवला उत्साह
केंद्रीय मंत्री ना.आठवले यांच्या संगमनेरच्या सभेने वाढवला उत्साह
*जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून भव्य स्वागताने भारावले मंत्री आठवले*
हिवरगाव पावसा प्रतिनिधी : संगमनेर येथील बस स्थानका समोर आरपीआयच्या वतीने सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांचे संगमनेर मध्ये जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून भव्य दिव्य असे स्वागत केले. मंत्री आठवले यांची वाजत गाजत फटक्याच्या अतिषबाजीत सभास्थळा पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.ना.आठवले यांना येण्यास रात्री उशीर झाला तरी संगमनेर बस स्थानका समोर अलोट गर्दी उपस्थित होती. मंत्री ना.आठवले यांच्या काव्यमय व दमदार भाषणाने कार्यकर्ते,पदाधिकारी व उपस्थितांचा उत्साह वाढविला. ना.आठवले यांच्या संगमनेरच्या रेकॉर्ड ब्रेक सभेने शिर्डी मतदारसंघात दमदार एन्ट्री व उमेदवारी बाबत उत्कठा निर्माण झाली आहे.
सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळ्यास माजी मंत्री तथा केद्रीय कार्यकारणी सेक्रेटरी अविनाश महातेकर,प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे,युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे,जनरल सेक्रेटरी गौतम सोनवणे,महिला आघाडीच्या आशाताई लांडगे, राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव,आरपीआय राज्याचे नेते विजयराव वाकचौरे,बाळासाहेब गायकवाड,दिपक गायकवाड,जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे,दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे व युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे यांच्या सह आरपीआयचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जरी मला येण्यासाठी झाली असेल देर ,तरी मी आलो आहे तुमच्या संगमनेर,मी तर आहे महाराष्ट्राचा शेर मग का नाही येणार तुमच्या संगमनेर,अशा मंत्री रामदास आठवले यांनी काव्यमय व दमदार भाषणाने सुरुवात केली.
बाबासाहेबाचे संविधान देशाला एकत्र ठेवणारे आहे.सर्व धर्म संभाव जपणारे संविधान आहे.बौध्दांनी हिंदूंचा आदर करणे,हिंदुनी बौध्दांचा आदर करणे.तर बौध्दांनी मुस्लिमांचा आदर केला तर सामाजिक सलोखा निर्माण होणार आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आरपीआय ची भूमिका आहे.तसेच शासनाने मराठा आरक्षणाची कार्यवाही तातडीने करण्याची मागणी केली. उमेदवारी मिळाली अथवा नाही तरी मी दलित,बौध्द,मराठा,ओबीसी,अल्पसंख्यांक यांच्या सह या भागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव पाठीशी राहील असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिले.
तसेच लोकगायिका कडूबाई खरात यांच्या क्रांतीकारी भीमगितांचा कार्यक्रमास उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला.लोकगायिका कडूबाई खरात यांच्या सदाबहार गाण्यांवर तरुणाईने ठेका धरला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत कला सम्राज्ञी पवळा कलामंचाच्या वतीने लोकगायिका कडूबाई खरात यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव तर सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी केले.कार्याक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, तालुका कार्याध्यक्ष विजय खरात,युवक तालुकाध्यक्ष योगेश मुन्तोडे सह संगमनेर तालुका आरपीआयचे सर्व पदाधिकारी यांनी सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.