क्राईम

चटई क्षेत्राची चोरी करून महापालिकेची फसवणूक; एकता व्हिला हौसिंगविरुद्ध मनपा आयुक्तांना तक्रार, उच्च न्यायालयासह हरित लवादकडेही मागणार दाद


चटई क्षेत्राची चोरी करून महापालिकेची फसवणूक;

एकता व्हिला हौसिंगविरुद्ध मनपा आयुक्तांना तक्रार, उच्च न्यायालयासह हरित लवादकडेही मागणार दाद

नाशिक प्रतिनिधी

महापालिका प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून राज्यात दबदबा असणाऱ्या राजकीय नेत्याच्या भागीदार विकासकाने नाशिक महापालिका प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून पाथर्डी फाटा येथे सव्हें क. २३१ वर बेकायदेशीर बांधकाम केल्याची तक्रार महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. ही तक्रार दाखल होऊन 15 दिवस उलटल्यानंतरही नगर रचना विभागाकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने मनपा प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकली की मनपा प्रशासन आणि विकासक यांनी संगनमताने ग्राहक आणि शासनाच्या डोळ्यात धूळ फेकली याबाबत तर्क वितर्क व्यक्त होत आहेत.

 

Advertisement

या विषयी तक्रारदार अमोल गवळी यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलतांना सांगितले की सदर मिळकतीमध्ये एकता व्हिलाचे सुमारे ६० रोहाउसचे बांधकाम बिल्डरने केलेले आहे. त्यापैकी जवळपास ३० रोडाउसमध्ये ३ रूम किचन ऐवजी ४ रूम किचनचे बांधकाम करून नगरपालिकेने मंजुरी दिल्यापेक्षा जवळपास ३५० फुटाचे अतिक्रमण करणारे व बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे. तसेच रोहाउस क. १५ व १७ मध्ये ३ बीएचके ऐवजी ५ बीएचके असे बेकायदेशीर बांधकाम करून प्रत्येकी जवळपास ६०० चौ. फुटाचे अतिक्रमण करणारे बांधकाम करण्यात आलेले आहे व अशा बांधकामाला नगररचना अधिकारी यांनी परिस्थितीची पाहणी न करतां, जागेवर न जातां कम्प्लीशन प्रमाणपत्र दिले आहे. ते पुर्णपणे बेकायदेशीर आहे. जागेवर जावून पाहणी करावी व जवळपास ३२ रोहाउसमध्ये बेकायदेशीर जे बांधकाम करण्यात आले ते तात्काळ बेकायदेशीर असल्याने पाडून टाकण्याचे करावे. तसे न केल्यास नाईलाजाने जनआंदोलन उभे करावे लागेल व कारवाई करावी लागेल. त्याचे परिणामांना तुम्हांस जबाबदार धरण्यात येईल.असा इशारा या तक्रारीत देण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *