मोहिनीदेवी रुंगटा विद्यामंदिरचे संगणक परीक्षेत यश
मोहिनीदेवी रुंगटा विद्यामंदिरचे संगणक परीक्षेत यश
नाशिक – प्रतिनिधी
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या संगणक अकादमी तर्फे विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत मोहिनीदेवी रुंगटा प्राथमिक विद्यामंदिर या शाळेने घवघवीत यश संपादन केले. पाॅवर पॉईंट प्रेझेंटेशन या स्पर्धेत अनुष्का हेमंत गवळी व आरव रुपेश तुपलोंढे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माया गोसावी, संगणक समन्वयक ज्ञानेश्वरी शिंदे, संगणक शिक्षिका कोमल लहामगे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र कलाल, उपाध्यक्ष एम. जी. कुलकर्णी, सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला, शालेय समिती अध्यक्ष शिवशंकर गाडेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका माया गोसावी व शाळेतील शिक्षकांनी अभिनंदन केले.