खा. शरद पवार यांचे संगमनेरात जल्लोषात स्वागत मा. आ.डॉ तांबे, डॉ जयश्रीताई थोरात यांच्यासह महाविकास आघाडीने केले उत्स्फूर्त स्वागत
खा. शरद पवार यांचे संगमनेरात जल्लोषात स्वागत
मा. आ.डॉ तांबे, डॉ जयश्रीताई थोरात यांच्यासह महाविकास आघाडीने केले उत्स्फूर्त स्वागत
संगमनेर (प्रतिनिधी)
– ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार हे अकोले येथे कार्यक्रमासाठी जात असताना मा.आ .डॉ. सुधीर तांबे व युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांसह महाविकास आघाडीच्या विविध कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले.
अकोले नाका येथे महाविकास आघाडीच्या वतीने ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, शिवसेनेचे अमर कतारी, राष्ट्रवादीचे वसंत पवार, यांच्यासह संगमनेर शहरातील व तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी व यांच्यासह संगमनेर शहरातील व तालुक्यातील काँग्रेस काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार शरदचंद्र पवार यांचे रस्त्यावर विविध ठिकाणी मोठ्या अबूतपूर्व जल्लोषात स्वागत करण्यात आले. अकोले नाका येथे आगमन होताच तरुणांनी प्रचंड जल्लोष केला .यावेळी फटाक्याची आतिषबाजी आणि ढोल ताशांचा गजर झाला.
खासदार पवार यांनीही सर्वांशी हात मिळवत अभिवादन स्वीकारले. या प्रसंगी मा. आ. डॉ तांबे यांनी हस्तांदोलन केल्यानंतर कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचे आशीर्वाद घेतले .यावेळी खासदार पवार यांनी पाठीवर थाप टाकून डॉ. जयाताईंना आशीर्वाद दिला..
यावेळी मा.आ डॉ तांबे म्हणाले की, भाजपाकडून सातत्याने भेदभावाचे व धार्मिकतेचे राजकारण केले जात आहे. लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे .अशा परिस्थितीमध्ये खासदार शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी लढत असून संविधान वाचवण्यासाठीच्या या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले
तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, वयाच्या 84 व्या वर्षी शेतकरी ,सर्वसामान्य माणूस, नागरिक, युवक, महिला आणि देशाची लोकशाही या सर्वांच्या भवितव्यासाठी पवार साहेब यांचा लढा सुरू आहे. त्यांचा उत्साह आणि काम करण्याची पद्धत ही सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाल्या
यावेळी युवक कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली
चौकट
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची महत्त्वाची बैठक आज मुंबईत होत असल्याने काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात हे या बैठकीसाठी उपस्थित होते. त्यामुळे संगमनेर मध्ये खासदार पवार यांचे मा आमदार डॉ तांबे व डॉ जयश्रीताई थोरात यांच्यासह सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यां नी स्वागत केले