सिन्नर तालुक्यातील मानोरी येथे प्रहार शाखा उद्घाटन
सिन्नर तालुक्यातील मानोरी येथे प्रहार शाखा उद्घाटन
सिन्नर प्रतिनिधी
मानोरी तालुका सिन्नर येथे प्रहारची शाखा उद्घाटन प्रहार दिव्यांग संघटना प्रहार जनशक्ती पक्ष संयुक्तपणे उद्घाटन झाले दिव्यांग संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष ग्रामीण नाशिक भाऊसाहेब पुंजा भाऊ सांगळे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले . दिव्यांग संघटनेचे सिन्नर तालुकाध्यक्ष गणपत नाठे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. गावातील जागृत देवस्थान म्हसोबा महाराज कैलास दातीर जनशक्ती तालुका अध्यक्ष सिन्नर यांच्या हस्ते नारळ अर्पण करून पूजा करण्यात आली .
प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष पुष्पा भोसले यांच्या हस्ते गावातील प्रहारच्या कार्यालयाचे दिव्यांग भूमिपूजन नारळ फोडून करण्यात आले.. यावेळेस नवनाथ मस्के सर यांनी सूत्रसंचालन केले.
जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, दिव्यांग तालुकाध्यक्ष गणपत नाठे ,जनशक्ती तालुकाध्यक्ष कैलास दातीर, सिन्नर तालुका दिव्यांग कार्याध्यक्ष दत्तात्रय लोंढे,, तक्रार निवारण समितीचे तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष गणेश मस्के ,युवा नेते कपिल कोठुरकर, महिला तालुकाध्यक्ष पुष्पा भोसले शाखाध्यक्ष मानोरी अर्जुन कर्डक , मस्के सर, आहेर सर उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य अनेक महिला कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.