खा. कराड यांच्या पी एचा हतगड किल्यावर गोंधळ;सुरगाणा पोलिसांनी केली कारवाई
खा. कराड यांच्या पी एचा हतगड किल्यावर गोंधळ;सुरगाणा पोलिसांनी केली कारवाई
सुरगाणा प्रतिनिधी
हतगड किल्याजवळ आरडाओरड करीत शांतता भंग करीत इतरांना त्रास होईल असे वर्तन केल्याने पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे.
अमोल मच्छिंद्र मलिक वय ३१ रा.महालगाव जि संभाजी नगर असे या संशयिताचे नाव असून तो नगराध्यक्ष वंदना प्रदिप पटेल यांचा भाऊ तर खासदार यांचा पि ए असल्याची धमकी पोलिसांना देत होता. त्यावेळी गस्ती वर असलेले सुरगाणा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुजित पाटील पोलिस नाईक बागुल पो शि चारोस्कर आदींनी सदर इसमास आरडाओरडा करण्यास रोखले असता सदर इसमाने औरंगाबाद नगराध्यक्ष व खासदार कराड यांची धमकी देऊन कोणाला घाबरत नाही तुम्हाला काय करायचे ते करा परंतु पोलीस उपनिरीक्षक सुजित पाटील यांनी सदर धमकीला भीक न घालता महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११२/११७ प्रमाणे कारवाई केली आहे.
………