नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात छत्रपती संभाजी महाराज यांचे विजयाचे आशीर्वाद सार्थकी लागतील:करण गायकर
नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात छत्रपती संभाजी महाराज यांचे विजयाचे आशीर्वाद सार्थकी लागतील:करण गायकर

नाशिक प्रतिनिधी
पूर्व नाशिक विधानसभा मतदार संघात स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार करण गायकर यांनी पुण्यातील स्वराज्य भवन येथे स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराजांची भेट घेऊन विजयाचे आशीर्वाद घेतले.नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी देऊन जनसेवेची संधी उपलब्ध करून दिली,याबद्दल मी स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्य पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.व हे आशीर्वाद सार्थकी लागतील असा विश्वास करण गायकर यांनी व्यक्त केला.
या संदर्भात अधिक माहिती देतांना करण गायकर म्हणाले,पुण्यातील स्वराज्य भवन कार्यालयात छत्रपती संभाजी महाराजांनी निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन केले आणि विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करत,नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात स्वराज्याचा ध्वज विजयाच्या रूपात फडकवण्याचे आश्वासन उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ.धनंजय जाधव,उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव मामा गोसावी,उत्तर महाराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर थोरात,नाशिक जिल्हा प्रमुख डॉ.रुपेश नाठे यांच्यासह स्वराज्य पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण क्षणी अनेक वर्षे भावासारखी साथ देणारे माझ्या प्रत्येक निर्णयात सक्रियपणे साथ देणारे केंद्रीय कार्याध्यक्ष विजय अण्णा वाहूळे,प्रदेश युवा सरचिटणीस नवनाथ भाऊ शिंदे,उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ. किरण डोखे,राज्य उपाध्यक्ष सुभाष भाऊ गायकर,आयटी राज्य संपर्कप्रमुख वैभव दळवी,तसेच तुषार जगताप,आकाश हिरे आणि अनेक प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“स्वराज्य प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनात नाशिक पूर्व मतदारसंघात परिवर्तनाच्या ध्वजाखाली जनसेवा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे व्रत मी घेतले आहे.”
-करण गायकर



