कसमादे भागातून मराठा समाज बांधव हजोरोंच्या संख्येने मुंबई आंदोलनात सहभागी होणार आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई न सोडण्याचा निर्धार
कसमादे भागातून मराठा समाज बांधव हजोरोंच्या संख्येने मुंबई आंदोलनात सहभागी होणार
आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई न सोडण्याचा निर्धार
Advertisement
कळवण प्रतिनिधी
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील पुकारलेल्या आंदोलनाच्या पूर्व तयारीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी अकरा वाजता मार्केट कमिटी हॉल देवळा येथे तर दुपारी तीन वाजता सटाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट हॉल बैठक पार पडली तर सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय या ठिकाणी तालुका निहाय बैठका संपन्न झाल्या.
या बैठकी प्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर,नानासाहेब बच्छाव,वैभव दळवी,कल्पेश पाटील, ज्ञानेश्वर कवडे,निलेश टुबे,विक्रांत देशमुख आदी सह नाशिकहून मराठा समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी उपस्थित तिन्ही तालुक्यांतील समाज बांधवांना मार्गदर्शन करताना मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर यांनी सांगितले की,मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आता निकालाचा लढा गरीब मराठ्यांसाठी उभा केला आहे हा मुंबईचा शेवटचा लढा आहे व या लढ्यासाठी मराठा समाजाने आता पूर्ण ताकदीने त्यांना साथ द्यायची असून त्यासाठी कसमादेतील तिन्ही तालुके ज्याप्रमाणे मराठा क्रांती मोर्चा नऊ ऑगस्ट रोजी मुंबई येथे सहभागी झाले होते त्याच ताकदीने सर्व समाज बांधव पुन्हा एकदा मुंबई येथे येण्याचे नियोजन करा,आपल्याकडे जी वाहने असतील त्या वाहनांमध्ये आपल्या सोबत सर्व समाज बांधवांना एकत्र करून सर्वांनी 24 तारखेला सकाळी अकरा वाजेपर्यंत नाशिक येथील शिवतीर्थावर मुंबईला जाण्यासाठी मोठ्या संख्येने जमायचे आहे. सध्या सकल मराठा समाजाच्या बैठका होत आहेत त्या बैठकांमध्ये राजकीय पक्षाचे पुढारी त्यामध्ये आमदार, खासदार,जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांसह ग्रामपंचायती सह सरपंच यांचा सक्रिय सहभाग दिसून येत नाही,या सर्व नेत्यांना निवडणुकीत ओबीसी मते मिळणार नाही याची जर भीती वाटत असेल तर मराठा समाजाने सुद्धा येणाऱ्या निवडणुकीत या एकही लोकप्रतिनिधींना मराठा समाजाची मते देवू नये असा संकल्प आपण सर्वांनी करूया, जे लोक सकल मराठा समाजाच्या आंदोलनात दिसतील त्यांच्या पाठीशी समाज उभा राहील जे लोक आंदोलनात येणार नाहीत त्यांना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवला जाईल असा संकल्प करून समाजाने यापुढे आता हा लढा लढायचा आहे या लढ्यासाठी संपूर्ण ताकद मराठा योद्धा जरांगे पाटलांना आपण देऊन मराठा आरक्षण मिळवूनच मुंबईतून परत घरी यायचे आहे त्याबाबत आता काटेकोरपणे आपण सर्वांनी नियोजन करावे असे आव्हान केले.
मराठा आरक्षणासाठी ज्यांनी शिवतीर्थ नाशिक येथे उपोषण केले त्या नानासाहेब बच्छाव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपण सर्वांनी मुंबईमध्ये होणारे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपली एकजूट महत्त्वाची आहे.हा लढा आपण शांततेच्या मार्गाने करणार आहोत या लढ्यासाठी आपल्याकडून जी काही मदत होईल ती आपल्या येणाऱ्या पिढीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असेल आज या लढ्यात आपण उतरलो नाही तर आपली पुढील पिढी याचा दोष आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपल्या पुढील पिढीचे जीवन चांगले जावे असे जर आपल्याला वाटत असेल तर या शेवटच्या लढाईत आपण सर्वांनी मोठ्या ताकदीने सहभागी व्हावे, किमान आठ दिवस आपल्याला मुंबईत आंदोलन करावे लागेल या दृष्टिकोनातूनच सर्वांनी तयारी करून मुंबईच्या दिशेने निघायचे आहे.
यावेळी सटाणा देवळा कळवण या तालुक्यातील समाज बांधवांनी बैठक सुरू असतानाच मुंबई येथील समाज बांधवांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी शेकडो तांदळाचे कट्टे तेलाचे डबे संकलन करण्याचा शब्द देत असतानाच सगळ्यात जास्त मदत ही सटाणा आणि कळवण तालुक्यातून होईल असा शब्दही दिला.व लगेच शंभर तांदळाचे कट्टे तीस तेलाचे डबे जमाही झाले. यावरून या लढ्याची तीव्रता किती मोठी आहे व समाज बांधव किती मोठ्या संख्येने येणार याची सरकारने नोंद घ्यावी असा सकल मराठा समाजाच्या वतीने ठराव मांडण्यात आला.
यावेळी तिन्ही तालुक्यात मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते यामध्ये देवळा तालुक्यामध्ये भारत आहेर,राजेंद्र शिरसाट, नंदन देवरे,राजेश आहेर,सचिन मोरे, भाऊसाहेब चव्हाण सुनील चव्हाण,गोकुळ अहिरे,जितू चव्हाण,नितीन सावंत,संदीप आहेर,महेश शेवाळे,युवराज देवरे, समाधान देवरे तर सटाणा तालुक्यातील योगेश सोनवणे विजयराज वाघ किशोर कदम लालचंद सोनवणे अरविंद सोनवणे अनिल पाटील डॉक्टर प्रसाद सोनवणे सुरेश नाना पवार वसंत भामरे संजय सोनवणे विशाल सोनवणे ज्ञानेश्वर देवरे संजय बिरारी आनंद सोनवणे प्रफुल आयरे राहुल पाटील हेमंत सोनवणे प्रशांत भारती फिरोज शेख भूषण शेवाळे संभाजी देवरे संदीप सोनवणे राकेश सोनवणे साहेबराव सोनवणे संग्राम राजे सुमित वाघ दादाजी सोनवणे विक्रम पाटील डॉक्टर आशिष सूर्यवंशी पिंटू बागुल अल्ताफ कादर शेख इत्यादींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कळवण तालुक्यातील प्रदिप पगार,प्रमोद रौदळ,जितेंद्र पगार, अजय पगार,अमित निकम,हेमंत पाटील, संतोष देशमुख,संदीप वाघ,संदीप शिंदे, मुन्ना काकूळते,रवी पगार,सुरेश पगार, स्वप्नील आहेर आदिसह समाज बांधव उपस्थित होते.