अकोले येथे पत्रकार भवनासाठी प्रयत्न करील:आ.किरण लहामटे; व्हॉइस ऑफ मीडियातर्फे जेष्ठ पत्रकारांचा जीवन गौरव पुरस्काराने सपत्नीक सन्मान
अकोले येथे पत्रकार भवनासाठी प्रयत्न करील:आ.किरण लहामटे;
व्हॉइस ऑफ मीडियातर्फे जेष्ठ पत्रकारांचा जीवन गौरव पुरस्काराने सपत्नीक सन्मान
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
………………………………………………………………………….
राजूर /प्रतिनिधी.अकोले तालुक्यातील पत्रकार व छायाचित्रकार यांच्यासाठी भवन उभारणार असल्याचा शब्द आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी दिला. अकोले तालुका व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केल्यानंतर आमदार लहामटे बोलत होते.व्हॉईस ऑफ मिडीयाचा अकोले तालुका पत्रकार संघाचा “जीवन गौरव पुरस्कार नुकताच संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी अकोले तालुक्याचे आ. डॉ.किरण लहामटे प्रमुख पाहुणे तर व्हॉईस ऑफ मिडीयाचे तालुका अध्यक्ष संदिप दातखिळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, शांताराम गजे, प्रकाश महाले , हेमंत आवारी विजय पोखरकर ” या सर्व जेष्ठ पत्रकारांचा आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून सपत्नीक सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री स्व.मधुकरराव पिचड यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.अकोले पोलीस स्टेशनचे पी आय मोहन बोरसे, प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार विलास पाटील, प्रथम नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, ऍड वसंत मनकर, ऍड के.बी.हांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संदिप दातखिळे यांनी संस्थेचे वैशिष्ट्य व कार्य समजून सांगितले. तसेच जागा उपलब्ध करून द्या, पत्रकार भवनांची माझी जबाबदारी असा शब्दही आमदार लहामटे यांनी दिला.
यावेळी व्हॉईस ऑफ मिडीयाचे कार्याध्यक्ष विलास तुपे, सचिव पांडुरंग हांडे ( जादूगार ), खजिनदार अक्षय आभाळे, प्रसिद्धी प्रमुख आबासाहेब मंडलिक , नोटरी क्लबचे अध्यक्ष सच्चिदानंद सातपुते ,हर्षदीप डावरे , शरद वामन, सचिन खरात, शशिकांत सरोदे सह संपूर्ण कार्यकारणी यावेळी उपस्थित होती.
यावेळी तालुका उपाध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावीक केले. तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन पांडुरंग हांडे यांनी केले व आभार अक्षय आभाळे यांनी मानले.