दिव्यांगाच्या मागणी निवेदन विषयावर पनवेल आयुक्त सकारात्मक प्रहार संघटने सोबत चर्चा
दिव्यांगाच्या मागणी निवेदन विषयावर पनवेल आयुक्त सकारात्मक
प्रहार संघटने सोबत चर्चा
पनवेल प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका अंतर्गत दिव्यांगांच्या विविध मागण्यांकरिता पनवेल महानगरपालिका आयुक्त श्री मंगेश चितळे साहेब (भा.प्र.से.) यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलं निवेदनात खालील दिव्यांगांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली
1. सिडको प्रशासनाकडून हस्तांतरित झालेल्या स्टॉल धारकांना 200 स्क्वेअर फिट पर्यंत जागा वाढवून देऊन 30 वर्षाचे करारनामे विविध शासन निर्णय तसेच सिडको महानगरपालिका यांच्यातील करारनामा महापालिका अधिनियम व माननीय श्री बच्चुभाऊ कडू यांच्या मंत्रालयीन बैठकीच्या अन्वये करण्यात यावे
2. पनवेल महानगरपालिकेने वाटप केलेल्या दिव्यांग स्टॉल धारकांना 30 वर्षाचे करारनामे करून देण्यात यावे
3. पनवेल महानगरपालिका अंतर्गत ज्या दिव्यांग स्टॉलधारकांना अजून पर्यंत परवाने मिळाले नाहीत त्यांना तात्काळ परवाने देण्यात यावे
4. दिव्यांग कायदा 2016 नुसार दिव्यांग भवनाची निर्मिती करण्यात यावी
अशा अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली बैठकीच्या वेळेला अतिरिक्त आयुक्त श्री राठोड साहेब व अतिक्रमण विभागाचे उपायुक्त श्री रविकिरण घोडके साहेब उपस्थित होते
प्रहार संघटने कडून कोकण विभाग अध्यक्ष श्री सुरेश मोकल, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री विशाल वाघमोडे, रायगड जिल्हा महिला उपाध्यक्ष नीलम वाघमारे, पनवेल शहराध्यक्ष श्रीधर कुदळे, संभाजी वाघमारे, सुजाता मोकल व गीता अन्नपूर्णे तसेच मोठ्या संख्येने प्रहार सैनिक उपस्थित होते