नाशिकच्या उच्चभ्रू हॉटेलमधून 2 करोडची रक्कम जप्त; निवडणूक निरीक्षक, पोलिस पथकाकडून नोटांची मोजणी
नाशिकच्या उच्चभ्रू हॉटेलमधून 2 करोडची रक्कम जप्त;
निवडणूक निरीक्षक, पोलिस पथकाकडून नोटांची मोजणी
नाशिक प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यास काही तास उरले असतांना नाशिकच्या एका बड्या हॉटेलमध्ये दोन कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निरीक्षक पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिस आणि निवडणूक निरीक्षक पथकाकडून ही रक्कम ताब्यात घेण्यात आली असून रक्कम मोजण्याचे काम सुरु आहे.
एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चासाठी ही कोट्यावधीची रक्कम नाशिक मध्ये आल्याची चर्चा आहे. एव्हढी मोठी रक्कम प्रचारासाठी हस्तगत केल्याने नाशिक जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान एम एच ४१ क्रमांकाच्या गाडीतही काही रोकड सापडल्याने राजकीय पुढाऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत.