मनमाडच्या चोंडी घाटात भीषण अपघात ; हिंदुस्तान पेट्रोलियम टँकर – ट्रकची समोरासमोर धडक
मनमाडच्या चोंडी घाटात भीषण अपघात ;
हिंदुस्तान पेट्रोलियम टँकर – ट्रकची समोरासमोर धडक
गणेश केदारे /मनमाड
मनमाडच्या चोंडी घाटात काही वेळापूर्वी भीषण अपघात झालाय. हिंदुस्थान पेट्रोलियमचा टँकर आणि ट्रक एकमेकांना समोरासमोर धडकले. ओव्हर टेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे प्रत्यक्ष दर्शी सांगतात.दोन्ही वाहनांमध्ये झालेल्या या भीषण अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे चालक व वाहक किरकोळ जखमी असून त्यांना उपचारासाठी मनमाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.या अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ थांबवण्यात आली आहे.