वंचित आघाडीचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अज्ञात वाहनाची पाठीमागून धडक ;घातपाताचा संशय : मध्यरात्री झालेल्या अपघातात शिंदे यांना गंभीर दुःखापत, अशोकात उपचार सुरु, प्रकृती स्थिर
वंचित आघाडीचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अज्ञात वाहनाची पाठीमागून धडक ;घातपाताचा संशय :
मध्यरात्री झालेल्या अपघातात शिंदे यांना गंभीर दुःखापत, अशोकात उपचार सुरु, प्रकृती स्थिर
सिडको प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीचे महानगर प्रमुख व देवळाली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अविनाश शिंदे यांच्या गाडीला रविवारी रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने मोठा अपघात झाला असून त्यात ते जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना अशोका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला, छातीला व मानेला मार लागला असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. यामागे घातपात असल्याचेही बोलले जात आहे.
रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास वडनेर गेट कडून डॉ. अविनाश शिंदे व त्यांचे दोन सहकारी हे देवळाली येथील संपर्क कार्यालयाकडे जात होते. त्या दरम्यान मागून आलेल्या एका वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. गाडीच्या मागील भागाची काच फुटून नुकसान झाले आहे. चालकाच्या शेजारी बसलेल्या श्री. शिंदे यांच्या मानेला, डोक्याला व छातीला जोरदार मुका मार बसला आहे. त्यानंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या ते आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. दैव बलवत्तर म्हणून ते बालबल बचावल्याचे सांगितले जात आहे. या मागे घातपात असल्याचा संशय डॉ.चंचल साबळे यांनी व्यक्त केला आहे. यामागील रहस्य शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
फोटो
वडनेर गेट : अपघातात नुकसान झालेले वाहन
.