क्राईम

व्हॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल मीडिया विंग प्रदेशाध्यक्ष पदी हर्षद लोहार यांची निवड; लवकरच होणार राज्य कार्यकारणी, जिल्हाअध्यक्ष यांची निवड; मुद्रित, साप्ताहिक, रेडिओ, उर्दू, ई. विंग सोबतच डिजिटल मीडिया विंग सक्षम करण्याचा व्हॉईस ऑफ मीडियाचा निर्धार


 

व्हॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल मीडिया विंग प्रदेशाध्यक्ष पदी हर्षद लोहार यांची निवड;

लवकरच होणार राज्य कार्यकारणी, जिल्हाअध्यक्ष यांची निवड;

मुद्रित, साप्ताहिक, रेडिओ, उर्दू, ई. विंग सोबतच डिजिटल मीडिया विंग सक्षम करण्याचा व्हॉईस ऑफ मीडियाचा निर्धार

Advertisement

 

मुंबई: (प्रतिनिधी) जागतिक पातळीवर ४७ देशात पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ३ लाख ९० हजार सदस्य संख्या असणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकाराच्या संघटनेच्या डिजिटल मीडिया विंग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सोलापूर येथील पत्रकार हर्षद लोहार यांची निवड केल्याचे राज्य कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर तथा राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकुलोळ यांनी जाहीर केले.
देशात व राज्यामध्ये सर्वात जास्त संख्येने मीडियात काम करणारा पत्रकारितेतील घटक म्हणजे डिजिटल पत्रकार. जगाची चक्रे वेगाने फिरत असताना व सध्या माहिती व ज्ञानाचा सर्वात मोठा स्त्रोत असताना देखील डिजिटल मीडिया बाबत देशात किंवा राज्यामध्ये कोणतीही तरतूद नाही, नियमावली नाही. डिजिटलच्या पत्रकारांना कोणतेही मान्यता,मानधन, योजना नाही किंवा भवितव्य बाबत नियोजन नाही. यासर्व गोष्टी लक्षात घेऊन पत्रकार व पत्रकारिता वाचली पाहिजे या उद्देशाने काम करणाऱ्या देशातील सर्वात मोठी पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडियाने डिजिटल मीडिया विंग सक्षम करून, या विंगच्या माध्यमातून डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना न्याय देण्याचे काम करण्यात येणार आहे.
डिजिटल मीडिया विंगच्या पत्रकारांना अधिकृत मान्यता, शासनाच्या विविध सोयी व सवलती मिळाव्यात म्हणून काम करण्यात येणार असल्याचे नुकतेच नियुक्त झालेले प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांनी सांगितले. येत्या काही दिवसात राज्याची कार्यकारणी आणि सर्व जिल्हाअध्यक्ष यांची निवड करणार असल्याचेही यावेळी लोहार यांनी सांगितले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी लोहार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील जास्तीत जास्त डिजिटल मीडिया पत्रकारांनी व्हॉईस ऑफ मीडियाचे सभासद व्हावे असे आवाहन प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, विजय चोरडिया, मंगेश खाटीक, उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ यांनी केले आहे.
लवकरच डिजिटल मीडिया विंगची उर्वरित राज्य कार्यकारिणी लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुकीतून निवडली जाणार आहे.
डिजिटल विंगचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, सरचिटणीस दिगंबर महाले, राज्य उपाध्यक्ष संजय पडोळे यांनी अभिनंदन केले.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *