क्राईम

पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याची धमक फक्त व्हॉईस ऑफ मीडियात; ब्रेव्हो!! संदीप काळे , अनिल म्हस्के व योगेंद्र दोरकर !!!; व्हॉईस ऑफ मीडिया जिंदाबाद!!


पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याची धमक फक्त व्हॉईस ऑफ मीडियात;

ब्रेव्हो!! संदीप काळे , अनिल म्हस्के व योगेंद्र दोरकर !!!;

व्हॉईस ऑफ मीडिया जिंदाबाद!!

 

*महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांना सामाजिक सुरक्षा ,सुविधा देण्याच्या दृष्टीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना अंतर्गत शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव पत्रकार कल्याण निधीमधील ठेवीवरील व्याजाच्या रकमेतून दरमहा 11 हजार रुपये एवढे अर्थसहाय पात्र जेष्ठ पत्रकारांना देण्यात येत होते. यावर विधान परिषदेत व्हॉईस ऑफ मीडियाचा आवाज आमदार धीरज लिंगाडे यांनी उचलला होता. शासनाचे लक्ष वेधले होते. दहा मार्च रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार अधिस्वीकृती धारक पात्र ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत दिले जाणारे अकरा हजार रुपयांचे अर्थसहाय्य वीस हजारां पर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.*

*सेवानिवृत्त ,अधिस्वीकृती धारक पत्रकारांचे मानधन ११ हजारावरून वरुन २० हजारावर करण्यात येते आहे!*

*स्वातंत्र्यलढ्यापासून स्वराज्य आणि स्वराज्यापासून सुराज्या पर्यंत वृत्तपत्रे आणि पत्रकार यांनी केलेले बलिदान आणि दिलेले योगदान कदापि विसरले जाऊ शकत नाही.मात्र सध्याच्या काळात पत्रकार आणि त्यांची कुटुंबे भोगत असलेला वनवास

संवेदनशील संपादक संदीप काळे आणि ईतरानी जगासमोर आणला.वास्तव स्विकारले आणि निमुटपणे न बसता त्यावर सुरू केलेल्या सकारात्मक लढ्याचे हे यश आहे .व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस, मंत्रीशंभूराज देसाई आ. धीरज लिंगाडे , मुख्यमंत्र्यांचेमाध्यम सल्लागार पाथरुडकर

जनसंपर्क महा संचालक ब्रिजेश सिंह यांना हृदयापासून धन्यवाद 🙏🏼

संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर , आपले अभिनंदन आणि समस्त पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने आपणास मानाचा सलाम!

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या सातत्यपूर्ण लढ्याला मोठे यश

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ परिवारांनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार मानावे तितके थोडेच.

Advertisement

अवघ्या तीन वर्षात देशभरातील पत्रकारांच्या समस्यांकडे लक्ष वेधून त्या शासनदरबारी मांडणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या रेट्यामुळे महाराष्ट्र शासनाने राज्यातील सेवानिवृत्त पत्रकारांच्या मानधनात दुप्पटीने वाढ केली आहे. याचा आधार घेत देश पातळीवर हा निर्णय ईतर राज्यातही अंमलबजावणीत आणण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी कंबर कसली आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस आमदार धीरज लिंगाडे शंभूराज देसाई, माध्यम सल्लागार पाथरुडकर ,

जनसंपर्क महा संचालक ब्रिजेश सिंग यांना हृदयापासून धन्यवाद! 🙏🏼

 

गेल्या अनेक वर्षापासून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पत्रकारांच्या निवृत्ती नंतरच्या उपजीविकेचा प्रश्न व आरोग्याच्या दृष्टीने आवाज उठवला होता. अखेर आज शासनाने याबद्दलचा शासन निर्णय निर्गमित करून हा विषय मार्गी लावला. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ला मिळालेल्या यशाबदल राज्यभरात अनेक ठिकाणी पदाधिकारी, पत्रकार आणि कुटुंबियांची दुवा घेतली आहे. सततचा पाठपुरावा आणि अधिवेशनातील मुद्द्यांवर आधारित आपल्या मागण्या शासनाकडे पाठवल्यामुळे त्यावर शासनाने गांभीर्याने विचार केला. ज्येष्ठ पत्रकारांना सामाजिक सुरक्षा सुविधा देण्याच्या दृष्टीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना अंतर्गत शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव पत्रकार कल्याण निधीमधील ठेवीवरील व्याजाच्या रकमेतून दरमहा 11 हजार रुपये एवढे अर्थसहाय पात्र ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येत होते. यावर विधान परिषदेत व्हॉईस ऑफ मीडियाचा आवाज आमदार धीरज लिंगाडे यांनी उचलला होता. शासनाचे लक्ष वेधले होते. दहा मार्च रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार निवृत्त आणि अधिस्वीकृती धारक पात्र ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत दिले जाणारे अकरा हजार रुपयांचे अर्थसहाय्य वीस हजारां पर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. समितीने शिफारस करून हा सकारात्मक निर्णय पुढे आणला आहे. हे व्हॉईस ऑफ मीडियाने दिलेल्या लढ्याचे यश आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी दुरध्वनीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.🙏🏼

 

~विष्णु जोंधळे

प्रवक्ता

व्हॉईस ऑफ मीडिया

  1. नंदुरबार जिल्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *