क्राईम

शिव राणा भेटीचा सुवर्ण योग : छत्रपती निघाले महाराणांच्या भेटीला  भारत क्रांती मिशनतर्फे जयपूरच्या राजभवनात साजरा होणार शिवजयंती उत्सव; नाशिककरांनी पाथर्डी फाटा येथून शिव रथयात्रेला दिला निरोप  


शिव राणा भेटीचा सुवर्ण योग : छत्रपती निघाले महाराणांच्या भेटीला 

 

 

भारत क्रांती मिशनतर्फे जयपूरच्या राजभवनात साजरा होणार शिवजयंती उत्सव;

नाशिककरांनी पाथर्डी फाटा येथून शिव रथयात्रेला दिला निरोप  

नाशिक : प्रतिनिधी

 

राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर येथील राजभवन येथे यंदा भव्य शिव जन्मोत्सव सोहळा संपन्न होत असून भारत क्रांती मिशनतर्फे आयोजित राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी नाशिकमधून शिव रथ यात्रेने आज रविवारी जयपूरकडे प्रस्थान केले. नाशिककरांच्या वतीने पाथर्डी फाटा येथील छत्रपती आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला अभिवादन करून शिव रथाला निरोप देण्यात आला. भारत क्रांती मिशन राष्ट्रीय शिव जन्मोत्सव समिती २०२५ तर्फे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत.त्यांच्या हस्ते बुधवारी (दि १९) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन होऊन भव्य अश्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात येणार आहे . यावेळी उद्घाटक प्रमुख अतिथी म्हणून राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा , शिवाजी राजे जाधवराव सिंदखेड राजा, सुदर्शन न्युजचे सुरेश चव्हाणके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत . छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशातील सर्व शिवप्रेमींनी माहित व्हावा या प्रमुख उद्देशाने जयपूर येथे शिव जयंती साजरी करण्यात येत आहे .

 

त्याच अनुषंगाने नाशिकहून शिवरथ जयपूरकडे मार्गस्थ करण्यात आला. तत्पूर्वी नाशिक येथील पाथर्डी फाटा येथे रविवारी (दि१६) सकाळी ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १३ फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळा सह पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Advertisement

शिवयात्रा रथास हार श्री फळ वाढवत यात्रा रथ पुढे मार्गस्थ झाला .

शिवरथ मार्गस्थ करण्यासाठी आमदार सिमा हिरे, निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ प्रताप दिघावकर, आयोजक डॉ विलास पांगरकर, विजय काकडे पाटील, दिपक पाटील,करण गायकर, परमेश्वर नलवाडे, राजाभाऊ खरात, रवि भारद्वाज, मिलिंद गायकवाड, जगदीश पांगरकर,शिवा तेलंग, आशिष हिरे, ज्ञानेश्वर थोरात, दत्ता पाटील, ऍड मयूर पांगारकर, शारदा दोंदे, छायाताई पांगरकर, अमोल अल्हाट, बाळा कदम, नंदू पगार, आदि, बाबासाहेब खाडे यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

नाशिक, भुजबळ फार्म, मुंबई नाका, व्दारका, आडगाव नाका, जत्रा हॉटेल चौफुली, ओझर, पिंपळगाव, मालेगाव, धुळे, आग्रा हायवे, शिरपूर , सेंदवा, खळघाट, इंदोर बायपास, नारायण पुरा येथे मुक्काम, जावरा, मंचुर, निमज, निबखेडा, चितोडगड, भिलवाडा, किशन गड, जयपूर भवन येथे ही यात्रा पोहचणार आहे. या शिवरथ यात्रे मध्ये हजारो शिवभक्त वाहनासह सहभाग झाले होते.

 

पिंपळ गाव टोलनाका येथे शिवरथ यात्रेचे स्वागत

आत्माराम नखले , वंदना कांबळे, मीनाक्षी गांगुर्डे, दीपक कदम, संपत कडाले, प्रीतपाल सिंग आदींनी केले.

 

” राजा शिव छत्रपती आणि महाराणा प्रताप या दोन हिंदू राष्ट्र पुत्रांनी आपल्या राष्ट्राचा इतिहासच बदलवला नाही, भूगोलालाही आकार दिला. हे दोन महान लढवय्ये राजें या भूमीत जन्माला आले, त्यांच्या कर्तृत्वाने या देशाला स्थैर्य मिळवून दिले. त्यांची ही भेट सुवर्ण क्षणाची नांदी आहे. यंदाचा राष्ट्रीय शिव जन्मोत्सव महाराणा प्रतापांच्या पराक्रमी भूमीत साजरा करण्याचा दुर्मिळ योग आहे. विशेष म्हणजे राजस्थानचे राज्यपाल हे देखील या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. हा दुग्ध शर्करा योग आहे. ”

-प्रताप दिघावकर

निवृत्त आयपीएस

सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *