क्राईम

सामाजिक कार्यकर्त्या सविता करण गायकर यांचा समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश


सामाजिक कार्यकर्त्या सविता करण गायकर यांचा समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश

नाशिक प्रतिनिधी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला तसेच विकासात्मक दृष्टिकोनाला पाठिंबा देत,नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ.सीमाताई महेश हिरे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्त्या सौ.सविता करण गायकर यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

हा भव्य पक्षप्रवेश सोहळा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन,नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

 

सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान सातपूर मधील प्रभाग क्रमांक 9 या भागातील प्रभावी सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या सौ.सविता करण गायकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेच्या माध्यमातून नागरिकांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत.त्या छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या पत्नी असून,समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने लढा देत आहेत.

Advertisement

मराठा आरक्षण,कामगारांचे प्रश्न, प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत समस्या यावर त्या नेहमीच ठाम भूमिका घेत आल्या आहेत.मागील महानगरपालिका निवडणुकीत अल्प मताधिक्याने झालेल्या पराभवानंतरही त्यांनी खचून न जाता अधिक जोमाने जनसेवेचे कार्य सुरू ठेवले. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी,कामगार व महिलांसाठी विशेष उपक्रम,तसेच कोविड काळात हजारो कुटुंबांना मदतीचा हात देत त्यांनी समाजाशी एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले.पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढणार सौ.सविता करण गायकर यांच्या भाजप प्रवेशामुळे सातपूर परिसरातील पक्ष संघटनेला मोठी बळकटी मिळणार असून आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा विजयाचा झेंडा फडकवेल,असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह प्रभागातील नागरिकांनी त्यांना भावी राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी त्यांच्यासोबत अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश सौ.सविता करण गायकर यांच्या सोबत प्रभाग क्रमांक 9 आणि सातपूर परिसरातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

यामध्ये – माजी नगरसेविका हेमलाताई कांडेकर,माजी महापौर दशरथ पाटील यांचे सुपुत्र प्रेम पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजय तुपलोंढे,विलास गायकवाड,तुषार पाटील छत्रपती शिवाजीनगर,श्रमिक नगर,धर्माजी कॉलनी,ध्रुवनगर येथील असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

या प्रवेशामुळे भाजपच्या संघटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून,पक्षाचे प्रभावी कार्य सातपूर आणि नाशिक परिसरात अधिक जोमाने पुढे नेले जाईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *