नाशिक मध्य मध्ये वसंत गीते तर पूर्व मध्ये गणेश गिते यांना मराठा समाजाचा एकमुखी पाठिंबा; गंगापूर रोड बैठकीला दिला बाय;ओबीसी मेळाव्यात समाजावर टिकेचा परिपाक
नाशिक मध्य मध्ये वसंत गीते तर पूर्व मध्ये गणेश गिते यांना मराठा समाजाचा एकमुखी पाठिंबा;
गंगापूर रोड बैठकीला दिला बाय;ओबीसी मेळाव्यात समाजावर टिकेचा परिपाक
नाशिक – प्रतिनिधी
विधानसभेच्या निवडणुकीसाठी मराठा समाज एकवटला असून नाशिक मध्य विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे वसंत गीते तर नाशिक पूर्व मतदार संघातील उमेदवार गणेश गिते यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
तुपसाखरे लॉन्स येथे रविवारी सायंकाळी झालेल्या मेळाव्यात मराठा बांधव तसेच भगिनींची लक्षणीय गर्दी होती. याप्रसंगी व्यासपिठावर माजी खासदार डॉ. प्रतापराव वाघ, खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते सुनील बागुल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, शाहू (महाराज) खैरे, निवृत्त पोलिस अधिकारी चंद्रकांत बनकर, निवृत्त पोलिस अधिकारी भामरे, राजेंद्र शेळके नाना महाले, माजी आमदार नितीन भोसले, कामगार नेते जगदीश गोडसे, अण्णा पाटील, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, वैशाली भोसले, बापू चव्हाण, सचिन मराठे, संजय चव्हाण, हरिभाऊ शेलार, सुभाष शेळके, डॉ. बी.जी. वाघ यांच्यासह मध्य नाशिकचे उमेदवार वसंत गिते, पूर्व मतदार संघाचे उमेदवार गणेश गिते तसेच समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना मराठा समाजाच्या नावाचा वापर करत गंगापूर रोडवर बैठक घेण्यात आली व कोणताही अधिकार नसताना समाजाचा पाठिंबा जाहीर केल्याचा अपप्रचार करण्यात आला. त्यामुळे मराठा समाजातील ज्येष्ठ धुरिणांनी तातडीने तुपसाखरे लॉन्स येथे बैठक बोलावून विचारविनिमय केला.
ओबीसी मेळाव्यात मराठा समाजावर टीका:-
प्रतिस्पर्धी उमेदवार दुटप्पी भूमिका घेत असून ओबीसी मेळाव्यात मराठा समाजावर टीका करायची व मराठा मेळाव्यात माफी मागायची अशी दुहेरी निती अवलंबत असून त्यापासून सावध रहाण्याचे आवाहन केले. मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार डॉ. प्रतापराव वाघ यांनी ही निवडणूक म्हणजे मराठा समाजाच्या अस्तिवाची लढाई असून समाजाच्या भल्यासाठी मध्य नाशिकचे उमेदवार गणेश गिते यांच्यासह शहर व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून परिवर्तन घडवा, असे कळकळीचे आवाहन केले.
– माँसाहेब जिजाऊ स्मारक उभारण्याचे वचन;
मध्य नाशिक मतदार संघातील उमेदवार वसंत गिते यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. या बैठकीत मध्य नाशिकचे उमेदवार वसंत गिते यांनी शहरात छत्रपती शिवाजी महाराज मंदिर तसेच माँ साहेब जिजाऊ यांचे स्मारक उभारण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगताना मराठा आरक्षणाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून कार्यरत रहाण्याचे अभिवचन दिले.
याप्रसंगी बोलताना मध्य नाशिकचे शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांनी मराठा समाजातील तरूण-तरूणींच्या उज्वल भवितव्यासाठी क्रांतीकारी नेते मनोज जरांगे यांच्या लढ्याचे कौतूक केले. मराठा आरक्षण ही काळाची गरज असून या लढ्यात मराठा बांधवांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे अभिवचन दिले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारण्याचे वचननाम्यात सांगितले असून या वचनाची पूर्ती करतानाच नाशिकमध्ये आदर्श असे माँसाहेब जिजाऊ यांचे स्मारक उभारले जाईल असे ठोस आश्वासन दिले. प्रतिस्पर्धी उमेदवार दुटप्पी भूमिका घेत असून ओबीसी मेळाव्यात मराठा समाजावर टीका करायची व मराठा मेळाव्यात माफी मागायची अशी दुहेरी निती अवलंबत असून त्यापासून सावध रहाण्याचे आवाहन केले. मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार डॉ. प्रतापराव वाघ यांनी ही निवडणूक म्हणजे मराठा समाजाच्या अस्तिवाची लढाई असून समाजाच्या भल्यासाठी मध्य नाशिकचे उमेदवार वसंत गिते यांच्यासह शहर व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून परिवर्तन घडवा, असे कळकळीचे आवाहन केले. मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे क्रांतीकारी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे रहाण्यासाठी वसंत गिते, गणेश गीते व महाविकास आघाडीला पूर्णपणे समर्थन देण्याचा सूर मराठा समाजाच्या मेळाव्यात उमटला.