वेश्याव्यवसाय चालविणा-या हॉटेलवर छापा ;नाशिकच्या तिघांसह हॉटेल मालकही अटकेत
वेश्याव्यवसाय चालविणा-या हॉटेलवर छापा ;नाशिकच्या तिघांसह हॉटेल मालकही अटकेत
नंदुरबार -प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या गुजरात सीमेलगत ‘हॉटेल हायवे’ नामक हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालवला जातो अशी गुप्त बातमी मिळाल्यावरून उपनगर पोलिसांनी तातडीने रेड केली असता पश्चिम बंगाल आणि अन्यत्रच्या मुली तिथे आढळून आल्या. याप्रकरणी अटक केलेल्या चौघांमध्ये नाशिक जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे.
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील नंदुरबार ते वाकाचार रस्त्यादरम्यान असलेल्या हॉटेल हायवे येथे दोन ते तीन इसम संशयितरित्या काही महिलांसोबत असल्याची माहिती मिळाली. यावरुन पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्यासह पथकाने जाऊन छापा टाकला. तेथे वैश्याव्यवसाय चालविणारे हॉटेल मालक चालक संजय ब्रिजलाल चौधरी, वय 45, रा.प्लॉट नं. 30, यमुना पार्क, निझर रोड, नंदुरबार त्यांचेसह ग्राहक योगेश कैलास अभाडे, वय- 40, रा. पठारे ता. सिन्नर, जि. नाशिक, मंगेश अशोकराव शेजूळ, वय 34, रा. गोपाळ नगर, जे 4, अमृत धाम, पंचवटी, नाशिक, महेश पांडुरंग काळवांडे, वय 37, रा. गोपाळ नगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक हे आढळून आले. तसेच एकूण 3 पीडित महिला मिळून आल्या.
सदर ‘हॉटेल हायवे’ मालक चालक संजय ब्रिजलाल चौधरी हा पैसे स्विकारुन पीडित महीलांसोबत शारिरीक संबंध करायला लावून त्या महिलांच्या वैश्याव्यवसायाच कमाईवर उदरनिर्वाह करीत होता. त्याअन्वये उपनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.346/2024 स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधि. 1956 चे कलम 3, 4, 5, 7(2)(a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोनि. अमितकुमार मनेळ हे करीत आहेत. ही कामगिरी नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, सपोनि संजोग बच्छाव, असई राजेंद्र दाभाडे, पोशि विपूल पाटील, कमलाकर चौरे, मपोशि गणेशा गावित यांनी केली आहे.