सणासुदीची विशेष मोहीम: सणासुदीच्या पार्शवभुमीवर अन्न व औषध प्रशासनाचा भेसळमुक्त अन्न पदार्थासाठी विशेष कारवाई
सणासुदीची विशेष मोहीम:
सणासुदीच्या पार्शवभुमीवर अन्न व औषध प्रशासनाची भेसळमुक्त अन्न पदार्थासाठी विशेष कारवाई
नाशिक प्रतिनिधी
सुरक्षित, निर्भेळ व सकस अन्न पदार्थ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने आपली प्रमुख कर्तव्य व जबाबदारी समजून भेसळ मुक्त अन्न पदार्थ मोहीम हाती घेतली आहे.त्याचाच एक भाग म्हणून गेल्या दोन महिन्यात अन्न व औषध प्रशासनाने भेसळ, बनावट उत्पादनाविरुद्ध मोहीम राबवून ठिकठिकाणी कारवाई केली आहे.
सणासुदीचे दिवस असल्याने दुध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, नमकीन. फरसाण, खाद्यतेल, वनस्पती, घी (तुप), आटा, रवा, मैदा, बेसन, ड्राय फुटस, चॉकलेट्स व तत्सम अन्न पदार्थाची मागणी जास्त असते. काही असामाजिक तत्वे अशा परिस्थितीचा फायदा घेत जास्त नफा मिळविण्याच्या उद्देशाने अन्न पदार्थामध्ये भेसळ करून आणि किवा अस्वच्छ व अनारोग्यकारक वातावरणात अन्न पदार्थाचे उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक व विक्री करण्याची दाट शक्यता असते, अशा असामाजिक तत्वे – व्यक्तीवर अन्न आस्थापनावर आळा वचक बसावा या साठी, व्यापक जनहित्त व जन आरोग्याचा विचार करून प्रशासनाच्या वतीने सणासुदीच्या काळात दिनांक ०१/०९/२०२४ पासुन विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
सणासुदीच्या काळात विशेष मोहीमेअंतर्गत प्रशासनाच्या नाशिक कार्यालयाने जिल्हाभरात
👉 दुग्ध व दुग्धजन्य जसे पनीर, घी इत्यादी अन्न पदार्थाचे २२ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेवून भेसळीच्या सशंयावरून ५६३ कि/ग्रॅ चा साठा जप्त करण्यात आला आहे त्याची किंमत रु ९९५७०/- आहे.
👉 मिठाई व नमकिन या अन्न पदार्थाचे एकूण ३२ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेवून भेसळीच्या संशयावरून
२१९ कि/ग्रॅ व त्याची किंमत रु ३१३५०/- आहे.
👉 रवा, मैदा, बेसन, भगर इत्यादी अन्न पदार्थाचे एकूण १९ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेवून भेसळीच्या सर्शयावरून ८६६ कि/में चा साठा जप्त करण्यात आला आहे त्याची किमंत रु ८६६००/- आहे.
👉 खाद्यतेल अन्न पदार्थाचे १६ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेवून भेसळीच्या सशंयावरून १०९२ कि/ग्रॅ साठा जप्त करण्यात आला आहे त्याची किंमत रु २९७४४०/- आहे.
👉 सणासुदीच्या काळात वापरण्यात येणारे इतर अन्न पदार्थ जसे चहा, शितपेय, मसाले इत्यादीचे १० अन्न नमुने विश्लेषणासाठी घेवूण भेसळीध्या सशंयावरून १९२८ कि/ग्रे साठा जप्त करण्यात आला आहे त्याची किंमत रु ८७१७३०/- आहे.
उपरोक्त सर्व अन्न पदार्थ विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायदातील तरतुदीप्रमाणे कारवाई घेण्यात येईल.
प्रत्येक नागरिकांस सुरक्षित व निर्भेळ अन्न उपलब्ध होण्यासाठी तसेच त्यात होणारी भेसळ रोखण्यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे. सदर मोहिम ही डिसेबर २०२४ पर्यंत अशीच चालू राहणार आहे. सदर बाबतीत ग्राहकांना अधिक माहितीसाठी प्रशासनाच्या टोल फ्री क्रं १८००२२२३६५ वर संपर्क साधावा तसेच अन्न पदार्थाबाबत काही तक्रार असल्यास नागरीक प्रशासनाच्या FoScos प्रणालीवरही ऑनलाईन तक्रार करू शकतात असे आवाहन म.ना. चौधरी (नाशिक विभाग) अन्न व औषध प्रशासन, म.राज्य, नाशिक यांनी केले आहे..