क्राईम

 70 वर्ष पूर्ण करून 71व्या वर्षात पदार्पण करणारा हुन्नरी तरुण:मगनलाल बागमार


 70 वर्ष पूर्ण करून 71व्या वर्षात पदार्पण करणारा हुन्नरी तरुण:मगनलाल बागमार

 

 

 

नाशिक – प्रतिनिधी

येथील नामको बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरव्यवस्थापक मगनलाल माणकचंद बागमार हे आज वयाचे सत्तर वर्ष पूर्ण करून 71 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत,

ते सिध्दहस्त कवी, कथाकार आणि ललित लेखक आहेत., आजही ते सहकारी बँकिंग आणि कामगार कायदे यावर मार्गदर्शन करीत असतात.

त्यांचे पिताश्री माणकचंद बागमार, मोहनलालजी कुमट, नामको बँकेचे आजी आणि माझी कर्मचारी यांचेकडून त्यांचे अभिष्टचिंतन होत आहे.

Advertisement

त्यांची असं होईलही पण…., हा काव्य संग्रह, दृष्टिकोन …., हा चारोळी संग्रह, प्रवचन सौरभ…नावाचे साध्वी श्री विजयाश्रीजी यांचे प्रवचनांचा मराठीतून पुस्तक, भक्तामर भक्ती नामक आचार्य मानतुंग यांच्या भक्तामर स्तोत्राचे मराठीतून निरुपण करणारी पुस्तिका, कल्याण मंदिर भक्ती नामक आचार्य सिध्दसेन यांच्या कल्याण मंदिर स्तोत्राचे मराठीतून निरुपण करणारी पुस्तिका, आणि अमृत कण नामक भगवान महावीरांची अंतिम वाणीचे मराठीतून निरुपण करणारे पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

आजही ते भगवान महववीरांचे तत्त्वज्ञानाचे अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *