केदा आहेरांना उमेदवारी न दिल्याने भाजपात खिंडार ? केदा आहेर समर्थनार्थ होणाऱ्या महामेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष
केदा आहेरांना उमेदवारी न दिल्याने भाजपात खिंडार ?
केदा आहेर समर्थनार्थ होणाऱ्या महामेळाव्याकडे जिल्ह्याचे लक्ष
देवळा प्रतिनिधी
यंदा मी नाही, भावाला आमदार करायचे असा निर्णय जाहीर करूनही भारतीय जनता पक्षाने चांदवड देवळा मतदार संघातून पुन्हा एकदा आ. डॉ. राहुल आहेर यांनाच उमेदवारी जाहीर केल्याने पक्षात बंडखोरी होण्याचे संकेत मिळत आहेत. या निर्णयामुळे जिल्हा उपाध्यक्ष किशोर चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत,तर काही जेष्ठ पदाधिकारी मागच्या निवडणुकीत बंडखोरी करून उभे असलेले जिल्ह्यातील एका बड्या प्रस्थासाठी राष्ट्रवादी शरद पवारांच्या संपर्कात असुन तुतारी हाती घेण्याच्या तयारीत असल्याने चांदवड, देवळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्यांनी अनेक वेळा राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली असल्याची खात्रीलायक माहिती आहे.तसे झाले तर भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसु शकतो. देवळा तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये केदा आहेर यांची उमेदवारी नाकारली जाते व विशेष म्हणजे स्वतः डॉ राहुल आहेर यांनी केदा आहेर यांच्या साठी पत्रकार परिषद घेऊन केदा आहेर यांना समर्थन दिले असताना मी माघार घेत केदा आहेर यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणार असल्याचे जाहीरपणे सांगितले असतांनाही भाजपने त्यांचे उमेदवार यादीत नाव क स माविष्ट केले यांच आश्चर्य देवळा तालुक्यातील आम जनतेला वाटते आहे.
काल एकीकडे देवळ्यात केदा नाना आणि डॉ राहुल यांच्या संयुक्त मेळाव्याची जोरदार तयारी सुरू होण्यापूर्वी काही तास आधी चांदवड तालुक्यात डॉ राहुल आहेर यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा होतो व डॉ आहेर यांनीच उमेदवारी करावी असा एकमुखी ठराव करुन पाठींबा दर्शविला जातो,यावरून दोन्ही तालुक्यातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे,
केदा आहेरांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने पक्षाचे जिल्हा उपाध्यक्षआणि डॉ दौलतराव आहेर यांचे कट्टर समर्थक असलेले जुने कार्यकर्ते,तत्कालीन देवळा तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केदा आहेर यांना उमेदवारी न मिळाल्याने पक्षाच्या स्थानिक पातळीवर मोठी अस्वस्थता पसरली असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.
उमेदवारीसाठी भाजपच्या वतीने केदा आहेर यांचे नाव प्रमुख दावेदारांमध्ये होते. अनेक वर्षे पक्षासाठी निष्ठेने काम करणारे, तसेच स्थानिक पातळीवर सक्रिय असलेल्या या नेत्याने मतदारसंघात आपली वेगळी छाप सोडली होती. आणि गेल्या सहा महिन्यांपासून पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ अनेक वेळा पिंजुन काढला आहे, अनेक उपक्रमही त्यांनी राबवले. त्यामुळे उमेदवारीची अपेक्षा ठेवली जात होती. मात्र, पक्षाने त्याऐवजी पुन्हा डॉ.राहुल आहेरांना संधी दिली आहे, यामुळे केदा नाना आहेर यांना ‘हेची फळं का मम तपाला’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.त्यामुळे अस्वस्थ होऊन जिल्हा उपाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
देवळा तालुक्यात सर्वत्र राजकीय अस्थिरतेचे वातावरण आहे,उमेदवारी संदर्भात पक्षाच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकामुळे कार्यकर्ते अस्वस्थ व संभ्रमात आहेत. अशा अस्थिर वातावरणात पदाधिकारी म्हणून काम करणे अवघड असल्याने मी राजीनामा देत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी राजीनामा जिल्हाध्यक्ष यांच्याकडे दिला असून तो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
या उमेदवारी वरून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.त्याचा फटका मात्र भारतीय जनता पक्षाला बसल्याशिवाय राहणार नाही.असा सुर मतदारसंघात उमटत आहे.कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ पक्षाच्या निर्णयाविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.आज संध्याकाळी सहा वाजता चांदवड येथील लासलगाव रोड वरील मंगलकार्यालयात चांदवड, देवळा तालुक्यातील केदा आहेर समर्थकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे, या संवाद मेळाव्यात बंडखोर उमेदवार केदा आहेर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,
“पक्षाचे वरिष्ठ नेते या सर्व घडामोडीवर काय प्रतिक्रिया देतात आणि मतदार संघातील कार्यकर्त्यांचा होरा काय राहतो,? केदा नाना आहेर यांच्या होणाऱ्या आरपारच्या लढाइकडे देवळा चांदवड वासीयांच लक्ष लागले आहे.”
-कुबेर जाधव विठेवाडीकर