नांदगाव मतदार संघात उबाठा गटाला खिंडार ; आमदार सुहास कांदे यांच्या विकासात्मक नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेनेत जाहीर प्रवेश
नांदगाव मतदार संघात उबाठा गटाला खिंडार ;
आमदार सुहास कांदे यांच्या विकासात्मक नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेनेत जाहीर प्रवेश
नांदगाव गणेश केदारे
नांदगाव मतदार संघात आ. सुहास कांदे यांच्या नेतृत्वात विश्वास दाखवून विविध पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत असून विशेषतः उबाठा गटाला कांदे यांच्या विकासात्मक नेतृत्वाची भुरळ पडत आहे.
त्याचाच अनुभव जातेगांव जिल्हा परिषद गटात पुन्हा एकदा आला. ढेकू पंचक्रोशीतील शिवसैनिकांनी सुहास कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केलेल्या या प्रवेशाने घाटमाथ्यावरील उबाठा गटाला खिंडार पडले आहे.कुणी कितीही डरकाळ्या फोडून कांदे यांच्या उमेदवारीला विरोध केला तरी खरा विकास कांदेच करू शकतात याची खात्री नांदगावकरांना पटल्याचे या प्रवेशाने सिद्ध केले आहे.
आ.कांदे यांनी गेल्या पाच वर्षात संपूर्ण मतदार संघ विशेषतः जातेगांव गटात विकासाची गंगा आणली. आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधीने या गटाकडे लक्ष दिले नव्हते. मात्र आमदार सुहास कांदे अपवाद ठरल्याने त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
हनुमानगर येथील देवाज बंगल्यावर झालेल्या प्रवेश सोहळ्यात निलेश चव्हाण, रवींद्र चव्हाण, अंकुश चव्हाण, गुलाब चव्हाण, बाळू सोनावणे, विजय सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी, देवीदास राठोड, लालचंद चव्हाण, सुनील सूर्यवंशी, योगेश गायके, मधुकर पवार, पृथ्वीराज चव्हाण, नितीन चव्हाण, आबा चव्हाण, देविदास चव्हाण, प्रवीण सूर्यवंशी, विजय चव्हाण, विजय राठोड, करण चव्हाण, यांनी प्रवेश घेतला.आ. कांदे यांनी त्यांचा भगवा देऊन स्वागत केले.
यावेळी हेमराज चव्हाण, विश्वास राठोड, एन. के. राठोड, राजेंद्र चव्हाण, आनंद सूर्यवंशी, ज्ञानेश्वर चव्हाण,आदी उपस्थित होते.