क्राईम

आजचे राजकारण सेवा की धंदा? कुबेर जाधव


आजचे राजकारण सेवा की धंदा?

 

कुबेर जाधव 

 

 

 

असे म्हणतात की

Politics is the last resort of scrondal

आणि ही भावना मोठ्या प्रमाणावर प्रतिध्वनीत होते. तथापि, आजच्या जगात, राजकीय सहभाग पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने, नैतिक मानके ढासळताना दिसत आहेत.आणि राजकारणात प्रवेश करणारे अनेक जण कमीतकमी सिध्दांत पाळणारे असतात. आजच्या काळातील राजकारण हे पैशाच्या आणि ताकदीच्या जोरावर चाललेले दिसते, ज्यामुळे यश मिळवण्यासाठी हाच मुख्य मार्ग बनला आहे.

ही दुर्दैवी वास्तविकता संस्कारित आणि नैतिक व्यक्तींना राजकीय प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्यापासून रोखते किंवा अशक्य होत आहे. निर्णय घेणाऱ्या संस्था हळूहळू समाजविरोधी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींनी भरल्या जात आहेत.

ज्यामुळे शासनाची गुणवत्ता आणखी खालावत आहे. मतदारांचा दृष्टिकोन असा आहे की राजकारणात अनेकदा प्रामाणिकतेपेक्षा आर्थिक प्रभाव आणि शारीरिक ताकदीला प्राधान्य देतात, यामुळे अनेक सक्षम आणि नैतिक व्यक्ती सहभागी होण्याचे टाळतात.

उच्च नैतिक मूल्य असलेल्या व्यक्तींना राजकीय क्रियांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. मतदारांना त्यांच्या आर्थिक स्थितीवर किंवा शक्तीवर अवलंबून न राहता, त्यांच्या प्रामाणिकतेवर आणि चांगल्या शासनाच्या दृष्टीकोनावर आधारित उमेदवारांना पाठिंबा देणे किंवा देण्यासाठी शिक्षित करणे आवश्यक आहे.

नैतिक नेतृत्वाचे महत्त्व वाढवण्यासाठी आणि सर्वांसाठी चांगल्या शासनाकडे मार्ग तयार करण्यासाठी जनजागृती आणि प्रोत्साहन देणारी सामूहिक चळवळ उभारणे गरजेचे आहे.वारसा हक्काने उमेदवारी सांगणारे प्रत्येक घराण्यातून पुढे येत आहेत .

प्रामाणिक कार्यकर्त्यास पक्षा श्रेष्ठी विचारत नाहीत.

Advertisement

पार्टी विथ डिपंरन्सम्हणणारे पण घराणेशाही राबवत आहेत.

ज्यांनी पूर्ण आयुष्य पक्षासाठी दिले,असे लोक फक्त प्रवक्ते होतात. सत्तेपर्यंत त्यांची सेवा त्याज्य असते.

सर्वात जुना काँग्रेस पक्ष गेले दहा वर्ष सत्तेतून बाहेर आहे, परंतु तेथील बडे प्रस्थ आजही पॉवर शिर्ष स्थानी दिसत आहेत.म्हणजे पक्ष कुठलाही असो चालवणारे फक्त तेच ते लोक जे आर्थिक संपन्न आणि “मसल पॉवर” वाले आहेत.

त्यामुळे सामान्य जनता,शेतकरी यांचे प्रश्न वर्षा नू वर्ष अनुत्तरित राहतात..याचा विचार जनतेने करावा आणि एखादा प्रामाणिक कार्यकर्ता उभा राहत असेल, तर त्यास सर्वांनी मदत करून निवडून द्यावे.तरच सामान्यांचे विचार करणारे विधीमंडळात दिसतील.

आजकाल राजकारण ऑब्जेक्टीव प्रश्ना सारखे झाले आहे. आदल्या दिवशी अभ्यास करा ,परीक्षा द्या आणि विसरून जा.

तसेच इलेक्शन आले की साम दाम दंड भेद वापरून निवडून यायचे व नंतर पाच वर्ष विसरून जायचे आणि पैसे कमवायचे.पुढील निवडणुकीची तयारी म्हणून गुंतवणूक करायची असे दिसते.

आज प्रत्येक पक्षात प्रामाणिक कार्यकर्ता वळचनित दिसतो.

व काल आलेला वारस पुढे जातो ही मार्केटिंग चैन अस्तित्वात दिसते.यासाठी ‘न खाऊंगा औंर न खाने दुंगा” हे घोषवाक्य लोकांना अपील झाले होते.आणि लोक प्रभावित पण झाले होते.राजकारणाचे शुध्दीकरण होईल अशी अपेक्षा निर्माण झाली होती. लोकांनी भरभरून पाठिंबा पण दिला होता.

परंतु थोड्याच दिवसात लोकांचा भ्रमनिरास झाला असे दिसते,

आणि “हमाम मे सब …” असे प्रत्ययास आले.

परंतु हा विचारच राजकारण शुद्ध करू शकते असा लोकांचा कयास आहे.

भलेही सुरवातीस काही यश मिळणार नाही,पण दूर दृष्टीने विचार झाल्यास जनता नक्की साथ देईल, याची खात्री वाटते.

असे होत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार आणि

तो पर्यंत राजकारण सामन्यांच्या आवाक्याबाहेरचे दिसते.

 

-कुबेर जाधव, समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *