लोकशाहीर आण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना पुण्य तिथि निमित्त काँग्रेस तर्फे आदरांजली.
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना पुण्य तिथि निमित्त काँग्रेस तर्फे आदरांजली.
वृत्त प्रतिनिधी- धुळे…
दिनांक: १ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी धुळे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव श्री. युवराज करनकाळ यांच्या नेतृत्वात, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त तसेच “भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक” यांची पुण्यतिथी निमीत्त धुळे शहरातील पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र आदरांजली वाहण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव युवराज करनकाळ, धुळे शहर जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष राजेंद्र खैरनार, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस भिवसन अहिरे, ओबीसी संघटनेचे रविदादा चौधरी, ओबीसी शिक्षक सेलचे प्रमुख प्रा. विलास पाटील, धुळे जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे उपाध्यक्ष आयुब सुभान खाटीक, असंघटित कामगार संघ सेलचे शहराध्यक्ष दीपक पाटील यांनी उपस्थित राहून महापुरुषांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.