स्वामी समर्थ चरित्र कथेचे भव्य दिव्य आयोजन – ख्यातनाम कथाकार गणेश महाराज करंजकर यांची संगीतमय स्वामी चरित्र कथा
स्वामी समर्थ चरित्र कथेचे भव्य दिव्य आयोजन
ठा न गाव येथील स्वामी समर्थ बाल संस्कार केंद्राचा उपक्रम
ख्यातनाम कथाकार गणेश महाराज करंजकर यांची संगीतमय स्वामी चरित्र कथा
स्वामी भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने श्रवण आनंद घ्यावा , आयोजकांचे आवाहन
प्रतिनिधी –
निर्व्यासनी समाज , आई – वडिलांच्या प्रती, ज्येष्ठांच्या प्रती कृतज्ञ समाज निर्माण व्हावा या उदात्त हेतूने ठाणगाव येथे श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्र यांनी दि. 17 मे ते 23 मे 2024 दरम्यान श्री स्वामी समर्थ चरित्र संगीतमय कथेचे भव्य दिव्य आयोजन केले आहे. ह. भ. प. गणेश महाराज करंजकर कथाकार आहेत. कथेच्या दरम्यान रोज 5. 30 वा. आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होईल. सायं 6 ते 8 श्री स्वामी समर्थ चरित्र कथा होईल व सायं. 8 वा. महाप्रसाद आहे. ही कथा ठाणगाव येथील सरकारी दवाखान्याच्या समोरील मैदानावर आयोजित केली आहे.
कथेच्या शुभारंभ प्रसंगी शुक्रवार दि. 17 रोजी सायं.4 ते 6 वाजे दरम्यान ठाणगाव मधून भव्य दिव्य मिरवणूक होणार असून या मिरवणुकीत जय जय स्वामी समर्थ मालिकेतील अभिनेते अक्षय मुदावडकर पूर्ण वेळ सहभागी होणार आहे.
शनिवार दि. 18 रोजी सायं. 5. 30 वा. पहिली संभळ वादक मोहिनी भुसे हीचा लोकप्रिय संभळ वादन कार्यक्रम होईल.
रविवार दि. 19 रोजी सायं. 5. 30 वा. स्टार प्रवाह फेम नाशिक येथील त्रिदल भजनी मंडळ यांचा स्वामी समर्थांवर सुमधुर भजन कार्यक्रम होईल. मंगळवार दि. 21 स्वरागिणी वर्षा एखंडे यांचे स्वामींचे गीत गायन हा कार्यक्रम होईल. बुधवार दि. 22 रोजी सायं. 5. 30 वा. काळभैरवाश्टकम पर नृत्याविष्कार होईल. गुरुवार दि. 23 रोजी या कथेची सांगता होणार आहे. सायं. 5. 30 वा. भजन आविष्कार हा कार्यक्रम होईल.
भक्तिमय वातावरणात होत असलेल्या श्री स्वामी समर्थ चरित्र संगीतमय कथेसाठी तालुक्यातील ग्रामस्थ व स्वामी समर्थ सेवेकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र ठाणगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.