तहानलेल्या वन्यजीव प्राण्यांसाठी साकारले पाणवठे, शिवकार्य गडकोट संस्थेच्या वतीने आंबोली -जव्हार घाटात श्रमदान
तहानलेल्या वन्यजीव प्राण्यांसाठी साकारले पाणवठे,
शिवकार्य गडकोट संस्थेच्या वतीने आंबोली -जव्हार घाटात श्रमदान
नाशिक :प्रतिनिधी
नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची अखंडित १९५ वी मोहिम पश्चिम घाटातील आंबोली -जव्हार घाटात (रविवार दि २१ रोजी) झाली.या मोहिमेत तहानलेल्या वन्यजीव पक्षांसाठी भर उन्हात पाणवठे तयार करण्यात आले.
यंदा सर्वत्र पाण्याची टंचाई आहे, यंदा पर्जन्यमान कमालीचे घटल्याने नैसर्गिक डोंगर घाटातील वर्षभर वाहणारे झरे नाले ही कोरडेठाक पडले आहेत.अश्या स्थितीत पश्चिम पट्ट्यातील डोंगर घाटात नैसर्गिक संसाधने ही वनवा, लाकूडतोड यामुळे ओसाड होण्याच्या स्थितीत आहे, त्यात उरल्या सुरल्या डोंगर घळीत थेंब थेंब झिरपणारे पाणी येथील वन्यजीव पक्षी यांची तहान भागवू शकेल याकामी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था अनेक बर्षे ऐन उन्हाळ्यात अश्या श्रमदानं मोहिमा घेत असते, स्व-खर्चाने,व श्रमाने हे काम उदात्त हेतू ठेवून करण्यात येते यावर्षी ही ते अखंडित सुरु आहे. अशी माहिती संस्थेचे प्रमुख राम खुर्दळ यांनी दिली.
या आधी रामगंगेचे खोरे,हरसूल घाट पाठोपाठ आज आंबोली -जव्हार घाटात जुन्या बारवे मागील घळीत सकाळ पासूनच श्रमदान करुन पाणवठे तयार करण्यात आले.जुन्या गाळ झालेल्या बुजलेल्या झिऱ्यातील गाळ काढून त्यांचे पाझरही मोकळे करण्यात आले तर त्यांचे बांध दगडी पिचिंग करुण भक्कम करण्यात आले असल्याचे ही त्यांनी सांगितले.
चौकट :
सोमनाथ भूरबुडे (अंबई ) :
मी गेल्या अनेक वर्षे पश्चिम घाटातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सह्याद्रीतील गडकोट, नैसर्गिक धबधबे,जुने स्थापत्य,व नैसर्गिक संसाधने याचा प्रचार प्रसार करतो त्यांच संवर्धन व्हावे म्हणून मी जागृती करतो, दिवसांगणिक नैसर्गिक जल स्रोत अधिक नष्ट होत आहे, हे योग्य नाही, आज शिवकार्य गडकोटने आमच्या भागात पाण वठे तयार केले, त्यात. मला ही सहभागी होऊन हे पुण्यवत काम करण्यात आले. हे. माझे भाग्यच, ही कामे शहरातील मंडळींनी अधिक केली पाहिजे, गावाकडे आलं पाहिजे.या मोहिमेत भर उन्हात शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ,गडअभ्यासक मनोज अहिरे, निसर्ग गड गाईड सोमनाथ भुरबुडे, निसर्ग कवी देवचंद महाले,शेतकरी मंगा भूरबुडे विशाल पारधी उपस्थित होते.
फोटो :
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या १९५ व्या दुर्ग संवर्धन मोहिमेत आंबोली -जव्हार घाटात वन्य जीव पक्षांची तहान भागवणे साठी पाणवठे तयार करताना दुर्गसंवर्धक,