ताज्या घडामोडी

*नाईक महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न*


*नाईक महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न*

          सिन्नर:-

Advertisement

येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व सक्सेस जॉब प्लेसमेंट यांच्या संयुक्त माध्यमातून नुकतेच कॅम्पस इंटरव्यूचे यशस्वी आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी दिली. रोजगार मेळाव्यात बजाज फायनान्स मॅनेजर अनिल पाटील , किशोर भामरे, सेल्स टीमलीडर मारुती सुझुकी रोहित सांगळे, एच आर मॅनेजर वाय एस एफ कंपनी श्री नवनाथ भराडे, एच आर मॅनेजर सक्सेस जॉब प्लेसमेंट प्रिया सपाटे ,एच आर मॅनेजर सक्सेस जॉब प्लेसमेंट दिव्या गांगुर्डे ,डायरेक्टर सक्सेस जॉब प्लेसमेंट गणेश आव्हाड अशा विविध कंपन्यांचे प्रमुख महाविद्यालयात रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने बीकॉम, बीएससी ,बीए च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यात बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखात देऊन नामांकित कंपनीमध्ये जॉब मिळवण्यासाठी पहिला टप्पा पूर्ण केला. यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील टप्प्याचे मुलाखतीसाठी नाशिक ,पुणे, अहमदनगर औरंगाबाद आदी ठिकाणी असणाऱ्या नामांकित कंपन्यांमध्ये ईमेल द्वारे व प्रत्यक्ष फोन द्वारे बोलविण्यात येणार असल्याची माहिती सक्सेस प्लेसमेंटचे संचालक गणेश आव्हाड यांनी सांगितले . या कॅम्पस इंटरव्यू उद्घाटन महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.बाळासाहेब चकोर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ्. किशोर पखाले यांनी केले. प्रस्ताविकात समन्वयक डॉ.बाळासाहेब चकोर यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी महाविद्यालयात राबवत असलेले विविध उपक्रमांची माहिती दिली. सक्सेस प्लेसमेंटचे संचालक गणेश आव्हाड यांनी आपल्या भाषणात यशस्वी कारकीर्द घडविण्यासाठीची सूत्रे विद्यार्थ्यांना समजावून सांगितली सर्व उमेदवारांना अधिकाधिक चांगला रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा विश्वास व्यक्त केला . कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर पखाले, समन्वयक डॉ. बाळासाहेब चकोर.आय क्यू सी डायरेक्टर प्रा. ज्ञानेश्वर चकोर. महाविद्यालयाचे परीक्षा विभागप्रमुख प्रा. संतोष आव्हाड, विद्यार्थी विकास अधिकारी, प्रा. अमोल आव्हाड रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रशांत हाडपे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.पूनम कुटे, प्रा.स्वाती चोथवे ,सानिका राजे ,रोहिणी वारुळे ,सारिका नागरे प्रा. शितल भगत ,प्रा. शुभम कलकत्ते प्रा. योगिता आव्हाड प्रा. रोहिणी वारुळे प्रा. प्रशांत गायकवाड प्रा. प्राजक्ता प्राजक्ता व प्रा सुजाता दिघे, व शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश रामराजे ,येलमामे, वर्षा पाटील, माधव सांगळे ,मंजुळे, पूर्ण देशपांडे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ज्योती गायकवाड यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *