राष्ट्रीय दृष्टीहिन संघातर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
राष्ट्रीय दृष्टीहिन संघातर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
नाशिक प्रतिनिधी
राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र संचालित कै.प्रा आर के रकिबे अंध विद्यार्थ्यांचे निवासी व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्र कृषी नगर नासिक येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला प्रमुख पाहुणे संघजन प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष अभय छल्लाणी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले अॕड. काशिनाथ कुलकर्णी, संघजन प्रतिष्ठानचे ज्येष्ठ मार्गदर्शक सदस्य नरेंद्र सोनवणे, प्रकाश दिक्षित , प्रदीप पाटील अॕड. काशीनाथ कुलकर्णी वृत्तपत्र लेखक संघटना अध्यक्ष रमेश कडलग, शिक्षक, विद्यार्थी कर्मचारी इत्यादी मान्यवर ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित होते.
अॕड. काशीनाथ कुलकर्णी , रमेश कडलग व प्रदीप पाटील यांनी १ में महाराष्ट्र दिन व संयुक्त महाराष्ट्र निर्मिती संबंधी आपले मनोगत व्यक्त केले चेतन बोरसे या विद्यार्थ्यांने महाराष्ट्र दिनवर आधारित गाणं सादर केले
मान्यवरांचे हस्ते संस्थेचे पदाधिकारी , शिक्षकवर्ग, कर्मचारी , विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला
संघजन प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य नरेंद्र सोनवणे यांनी संस्थे बद्दल आभार व्यक्त केले सूत्रसंचालन जगदीप कवाळ यांनी केले आभार प्रदर्शन अजित कुलकर्णी यांनी केले व अल्पोपहारचा कार्यक्रम झाला.