पै.शुभम सिदनाळेवर मात करीत पै.दिग्विजय भोंडवेस १३० किलो वजनगटात सुवर्णपदकाचा मानकरी
पै.शुभम सिदनाळेवर मात करीत पै.दिग्विजय भोंडवेस १३० किलो वजनगटात सुवर्णपदकाचा मानकरी
देवळाली कॅम्प ( प्रतिनिधी ):-
महाराष्ट्र राज्यातून जे संघ आलेले आहे. मित्रहो सांगण्याचा एवढा अभिमान वाटतो कारण स्वातंत्रवीर सावरकर यांचा जन्मगाव आहे. अर्ध्या खेळाडूंना माहीत असेल अर्ध्या खेळाडूंना माहीत नसेल. या पावनभूमीत तुम्ही आलेले आहे. महाराष्ट्रात मी बघितलं आमच्या पोलीस खात्यात महाराष्ट्रात जे हिंदी केसरी होते. ते नरसिंग यादव असो किंवा विजय चौधरी हे कुस्तीमध्ये विजेते झाले. त्यांना डायरेक्ट डीवायएसपी करण्यात आले होते. असे प्रतिपादन कुस्ती स्पर्धा उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक रमेश पवार यांनी केले. नाशिक येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व नाशिक जिल्हा कुस्तिगिर संघ यांच्या सहकार्याने वरिष्ठ ग्रिकोरोमन राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा दिनांक ३० एप्रिल व १ मे २०२४ रोजी बलकवडे व्यायाम शाळा भगूर नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त गुणवंत प्रेस कामगार प्रशांत कापसे, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रताप गायकवाड, नाशिक जिल्हा कुस्तिगिर संघाचे चे अध्यक्ष ॲड.विशाल बलकवडे , त्रंबकेश्वर कुस्तिगिर संघाचे तालुका अध्यक्ष सनी मेढे, जीवन गायकवाड, अविनाश दिवटे, विजू गामणे , शाम भागवत, संजय गायकवाड आधी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पवनपुत्र हनुमान प्रतिमेची पूजन करून श्रीफळ फोडून कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत १३० कीलो वजनगटातच्या अंतिम लढतीत पुणे जिल्ह्याच्या पै.दिग्विजय भोंडवे याने कोल्हापूरच्या पै.शुभम सिदनाळे वर २ मिनिटात ८ . ० गुणाने मात करत सुवर्णपदक मिळवले ,
या स्पर्धेचे आयोजन नाशिक जिल्हा कुस्तिगिर संघाचे अध्यक्ष ॲड.विशाल बलकवडे व त्यांचे पदाधिकारी यांनी केले होते. स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन प्रा.दिनेश गुंड यांच्या सहकार्यांनी केले . कुस्ती स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यासह मुंबई उपनगर, ठाणे शहर,अकोला,सांगली, कोल्हापूर शहर ,कोल्हापूर जिल्हा, नांदेड ,लातुर , पुणे जिल्हा,धुळे, सोलापूर जिल्हा , बीड , चंद्रपूर , संभाजीनगर , पिंपरी चिंचवड ,सातारा, अहमदनगर , अमरावती, बीड, जळगाव , मुंबई शहर, पुणे शहर , सोलापूर शहर अशा विविध जिल्ह्यातून महाराष्ट्र मधून कुस्ती स्पर्धेसाठी पैलवान सहभागी झाले होते. यावेळी कुस्ती स्पर्धा पंच समिती म्हणून दिनेश गुंड, गणेश कचरे, नितीन शिंदे ,सोनू काबुले,
संजय गायकवाड आदींनी काम पाहिले.
स्पर्धेचा अंतिम निकाल खालील प्रमाणे:
५५ कीलो गटात
प्रथम क्रमांक – पै.जयंत शेडगे, सातारा
व्दितीय क्रमांक – पै.ओमकार काळे , नाशिक
तृतीय क्रमांक – पै.वैभव पाटील , कोल्हापुर
तृतीय क्रमांक – पै.दिनेश काकडे , मुंबई उपनगर
..६० कीलो गटात:
प्रथम क्रमांक – पै.हितेश सोनवणे , चंद्रपूर
व्दितीय क्रमांक – पै.अर्जुन कांबळे , कोल्हापुर शहर
तृतीय क्रमांक – पै.किशोर धनगर , कोल्हापुर जिल्हा
तृतीय क्रमांक – पै.समीर शेख , धुळे
# ६३ कीलो गटात ,
प्रथम क्रमांक – पै अनुज सारवान, अमरावती
व्दितीय क्रमांक – श्रीकांत कामान्ना, कोल्हापुर शहर
तृतीय क्रमांक – पै.यशराज जाधव, सातारा
तृतीय क्रमांक – पै.धनजंय भंडारी , कल्याण
# ६७ कीलो गटात ,
प्रथम क्रमांक -पै.योगेश चंदेल , संभाजीनगर
व्दितीय क्रमांक – पै.पांडुरंग माने , सांगली
तृतीय क्रमांक – पै.उत्सव चौधरी , ठाणे
तृतीय क्रमांक – पै.प्रदिप यादव , अमरावती
# ७२ कीलो गटात ,
प्रथम क्रमांक – पै.ओंकार पाटील , कोल्हापुर
व्दितीय क्रमांक – पै.हरिदास भगत, नाशिक
तृतीय क्रमांक – पै.गोविंद मारापल्ले , लातुर
तृतीय क्रमांक – पै.जयदीप बडरे , मुंबई
# ७७ कीलो गटात ,
प्रथम क्रमांक – पै.विश्वजीत पाटील , कोल्हापुर शहर
व्दितीय क्रमांक – पै.नितीन कांबळे , कोल्हापुर जिल्हा
तृतीय क्रमांक – पै.हर्षवर्धन पाटील , मुंबई उपनगर
तृतीय क्रमांक – पै.हनुमंत व्यवहारे, सोलापूर
# ८२ कीलो गटात ,
प्रथम क्रमांक – पै.रुपेश धर्मोजी, कोल्हापुर
व्दितीय क्रमांक – पै.बाळु बिन्नर, नाशिक
तृतीय क्रमांक – पै.सतीश राठोड , अहमदनगर
तृतीय क्रमांक – पै.अमोल दिंडे, बीड
# ८७ कीलो गटात ,
प्रथम क्रमांक – पै.दर्शन चव्हाण, कोल्हापुर
व्दितीय क्रमांक – पै.सार्थक नागरे , नाशिक
तृतीय क्रमांक – पै.करण घनवट, अहमदनगर
तृतीय क्रमांक – पै.वैभव देशमुख, सांगली
# ९७ कीलो गटात ,
प्रथम क्रमांक – पै.युवराज खोपडे , पुणे शहर
व्दितीय क्रमांक – पै.गौरव ठाकरे , धुळे
तृतीय क्रमांक – पै.सचिन काळेल , मुंबई
तृतीय क्रमांक – पै.सागर शिंदे , सोलापूर
# १३० कीलो गटात ,
प्रथम क्रमांक – पै.दिग्विजय भोंडवे , पुणे जिल्हा
व्दितीय क्रमांक – शुभम सिदनाळे- कोल्हापूर
तृतीय क्रमांक – अदीत्य मोहोळ , पुणे शहर
तृतीय क्रमांक – पै.बालाजी मेटकर, मुंबई ,