ताज्या घडामोडी

नांदूर शिंगोटे परिसरामध्ये डिझेल चोरीच्या वाढत्या घटनांमध्ये वाढ  डिझेल चोरांचा छडा लावण्याचे पोलीस यंत्रणे पुढे आवाहन 


नांदूर शिंगोटे परिसरामध्ये डिझेल चोरीच्या वाढत्या घटनांमध्ये वाढ 

डिझेल चोरांचा छडा लावण्याचे पोलीस यंत्रणे पुढे आवाहन 

 

नांदूर शिंगोटे वार्ताहर

 

नांदूर शिंगोटे व परिसरातील भागाचा वाढता विस्तार बघता या भागांमध्ये गाव परिसरासह मोठा विस्तार वाढत असून गावाबाहेरील रस्ते व रस्त्यांवर असलेले हॉटेल्स व पेट्रोल पंप लहान मोठी व्यवस्था आहे यामुळे या ठिकाणी गावाचा संपूर्ण विस्तार वाढत चाललेला असताना बहुतांशी मोठ्या हॉटेल वरती रात्रीच्या वेळेस वाहने मुक्कामी थांबतात मात्र या थांबलेल्या वाहनांवर डिझेल चोरी करणारी टोळी डाका टाकून डिझेल चोरण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे यापूर्वीही नांदुर-शिंगोटे व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती डियर चोरीच्या घटना ताज्या असताना व त्यामधील चोरट्यांना पकडण्यात पोलिस यंत्रणेला आलेले अपयश हे लक्षात घेतले असतानाही गुरुवारी पहाटेच्या चार ते पाच वाजे दरम्यान गावाबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्यावर नंदुर शिंगोटे लोणी रस्त्यावर असलेल्या हॉटेल प्रियाल समोर बाहेरील राज्यातील वाहने रात्री मुक्कामी थांबलेली असताना सकाळी पाच ते सहा च्या दरम्यान काही डिझेल चोरांनी या ठिकाणी डिझेल चोरी केल्याचा प्रकार घडला यावेळेस त्यांनी सदरच्या वाहनातील कमीत कमी 15000 रुपये किमतीचे डिझेल चोरीला गेल्याचे सदरच्या वाहनधारकाने सांगितले मात्र सदरचा वाहनधारक हा बाहेरील राज्यातील असल्यामुळे तो पोलीस यंत्रणेपर्यंत पोहोचत नाही व पोलीस यंत्रणेपर्यंत गाराने मांडूनही काहीही उपयोग होत नाही हे समजल्यानंतर सदरच्या वाहनधारकाने गप्प राहून आपला पुढील प्रवास केला मात्र नांदूर शिंगोटे व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढण्याचे प्रकार व रस्त्यावरील वाहनांमधून डिझेल चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेले असतानाही याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे अनेक वाहनधारकांचे म्हणणे असून यामुळे येथील हॉटेल अन वरती वाहने मुक्कामी थांबण्यास धजावत नाही .

Advertisement

यापूर्वी नांदुर-शिंगोटे या ठिकाणी अनेक रस्त्यांवर डिझेल चोरी झालेली आहे मात्र त्याचा अद्याप पर्यंत काही स्थान पत्ता लागलेला नसतानाही या घटना वाढत आहे यासाठी पोलीस यंत्रणेकडून या भागात पेट्रोलियम वाढवण्यात यावी व गावाबाहेरचे सर्वच रस्त्यांवर पोलीस यंत्रणांकडून यावरती काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी वाढत आहे मात्र घडलेली घटना तेवढ्यापुरती मनावर घेऊन पुढील परिस्थिती जैसे थे राहत आहे मात्र कधी काही मोठा अनुचित प्रकार जर घडला तर यास कोण जबाबदार राहील यासाठी पोलीस यंत्रणेने वरिष्ठ पातळीवरून या भागातील डिझेल चोरांवर कार्यवाही करावी व त्यांच्या मुस्क्या आवळाव्या अशी मागणी वाहनधारकांसह हॉटेल चालक मालकांनी केलेली आहे.

 

 

नांदूर शिंगोटे परिसराचा वाढत असलेला विस्तार व गाव परिसराचा विचार करता या ठिकाणी रात्रीच्या वेळेस अनेक वाहने पेट्रोल पंप व मोठाले हॉटेल या ठिकाणी थांबतात मात्र या घटना सर्रास नांदूर भागामध्ये सुरू असून यासाठी पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढून अंधारकांची मुक्तता करावी
संजय शेळके एकविरा पेट्रोलियम संचालक


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *