Bussiness

शिवरायांच्या स्मारकासमोर हा कसला तमाशा? राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेचा बाजार मांडणाऱ्यांना जाहीर सवाल! लाज वाटली पाहिजे! ……


शिवरायांच्या स्मारकासमोर हा कसला तमाशा?

राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेचा बाजार मांडणाऱ्यांना जाहीर सवाल!
लाज वाटली पाहिजे!
……
होय, अगदी स्पष्ट शब्दांत सांगायचे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर केवळ राजकीय फायदा, प्रसिद्धी आणि तरुणांची गर्दी खेचण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेला जाब द्यावाच लागेल!
छत्रपती शिवाजी महाराज हे कुणाच्या राजकीय दुकानाची जाहिरात करण्यासाठी ठेवलेले नाव नाही. त्यांचे स्मारक हे सेल्फी पॉइंट नाही, निवडणुकीच्या प्रचाराचे स्टेज नाही आणि बाजारू आकर्षणाचा अड्डाही नाही!
शिवरायांच्या नावाने मतं मागायची आणि शिवरायांच्या स्मारकासमोर तमाशा करायचा? हा कोणता शिवप्रेमाचा प्रकार आहे?
ज्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण स्वाभिमानासाठी होता, ज्यांनी स्त्रियांच्या सन्मानाची शिकवण दिली, ज्यांनी परस्त्रीकडे मातेसमान पाहण्याचा आदर्श घालून दिला,त्याच शिवरायांच्या स्मारकासमोर महिलांच्या शारीरिक  आकर्षणाचा वापर करून राजकीय गर्दी जमविण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते  महाराष्ट्राच्या संस्कारांवरच प्रश्नचिन्ह आहे!
*राजकारणासाठी किती नीच होणार?*
आज राजकारणाची पातळी इतकी घसरली आहे की विकासाचे मुद्दे संपले, विचार संपले, धोरणे संपली आणि आता उरला तो फक्त गर्दीचा बाजार!
तरुणांना रोजगार द्या, कृती शून्य!
शिक्षणावर बोला, वाचा बसते!
महिलांच्या सुरक्षेवर चर्चा करा,षंड होतात!
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भूमिका घ्या, कृतघ्न होता!
महागाईवर उत्तर द्या, मौन धरता!
पण गर्दी जमवायची असेल तर ग्लॅमर आणा, आकर्षण निर्माण करा आणि त्याला सांस्कृतिक कार्यक्रमाचे लेबल लावा!
हे राजकारण नाही,ही जनतेच्या सहनशील  बुद्धीची थट्टा आहे!आणि तीही कुठे?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर!
यापेक्षा मोठा विरोधाभास कोणता असू शकतो?
*शिवरायांचे स्मारक आहे की राजकीय मेळाव्याचा सेट?*
हा प्रश्न आता प्रत्येक शिवप्रेमीने विचारला पाहिजे.
शिवरायांचा पुतळा उभारायचा आणि त्याच्यासमोर त्यांच्या विचारांना हरताळ फासायचा?
जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा द्यायच्या आणि त्याचवेळी शिवरायांच्या संस्कारांची पायमल्ली करणारे कार्यक्रम आयोजित करायचे?
*हा ढोंगीपणा महाराष्ट्र ओळखतो!*
शिवरायांचा फोटो बॅनरवर लावल्याने कोणी शिवभक्त होत नाही.गळ्यात भगवा घातल्याने कोणी शिवप्रेमी होत नाही.
मोठमोठ्या घोषणा दिल्याने कोणी शिवरायांचा वारसदार होत नाही.
शिवरायांचा वारसदार तोच, जो त्यांच्या विचारांचा सन्मान करतो!
बाकीचे फक्त शिवरायांच्या नावावर राजकीय दुकानदारी करणारे व्यापारी!
महिलांचा सन्मान भाषणात आणि वापर राजकारणात?
हा दुटप्पीपणा बंद झाला पाहिजे!
महिला सन्मानाच्या घोषणा करायच्या आणि दुसऱ्या बाजूला महिलांच्या उपस्थितीचा किंवा प्रतिमेचा वापर गर्दी खेचण्यासाठी करायचा,ही मानसिकता बदलली पाहिजे.
स्त्री ही कोणाच्या राजकीय कार्यक्रमातील गर्दी खेचण्याचे साधन नाही!
ती मनोरंजनाची वस्तू नाही!
ती प्रसिद्धी मिळविण्याचे माध्यम नाही!
आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर तर तिच्या सन्मानाचा प्रश्न अधिक संवेदनशीलतेने हाताळला गेला पाहिजे.
परवानगी देणाऱ्यांनाही जाब विचारला गेला पाहिजे!
हा कार्यक्रम कोणी आयोजित केला?
परवानगी कोणी दिली?
कार्यक्रमाचे स्वरूप कोणी तपासले?
शिवरायांच्या स्मारकाच्या परिसरात अशा कार्यक्रमांना परवानगी देताना कोणत्या निकषांचा वापर करण्यात आला?
जनतेला उत्तर हवे आहे!
प्रशासनानेही गप्प बसून चालणार नाही. संबंधित आयोजकांनीही मौन धारण करून चालणार नाही.
महाराष्ट्राच्या अस्मितेच्या प्रतीकाचा वापर कोणत्याही राजकीय किंवा वैयक्तिक प्रसिद्धीसाठी होत असेल, तर त्यावर स्पष्ट भूमिका घेणे ही समाजाची जबाबदारी आहे.
शिवरायांचा अपमान आम्हाला मान्य नाही!
शिवरायांचे नाव वापरून राजकारण करायचे आणि शिवरायांचे विचार बाजूला ठेवायचे, हा प्रकार चालणार नाही!
शिवरायांचा जयजयकार करून त्यांच्या संस्कारांचा विसर पडू देणार नाही!
स्मारकाचा सन्मान राखणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे!
आज जर अशा प्रकारांकडे दुर्लक्ष केले, तर उद्या शिवरायांच्या स्मारकांचे रूपांतर कोणाच्या तरी राजकीय जाहिरातफलकात होईल.
आज प्रश्न विचारला नाही, तर उद्या मर्यादा ओलांडली जाणार.
म्हणूनच या प्रकाराचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध!
ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांनी आत्मपरीक्षण करावे.
राजकीय फायद्यासाठी शिवरायांच्या स्मारकाचा वापर थांबवावा.
जनतेच्या भावना दुखावतील अशा आयोजनांबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी.
आणि भविष्यात
शिवरायांच्या स्मारकाच्या पावित्र्याशी खेळण्याचा प्रयत्न झाला, तर महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता गप्प बसणार नाही!
 छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त पोस्टरवरचे नाव नाहीत,ते महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत!
आणि स्वाभिमानाचा बाजार मांडणाऱ्यांना जनता कधीच माफ करत नाही!
शिवरायांच्या नावाने दुकानदारी बंद करा… विचारांचा सन्मान करा!
स्मारकाचा सन्मान राखा… राजकारणाचा बाजार बंद करा!
जय शिवराय! जय महाराष्ट्र!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *