एका बदलीने वणी पोलिस अॕक्शन मोडमधे अवैध दारु विक्री व जुगार अड्यांवर कारवाई; गाव इभ्रतीसाठी गावकऱ्यांनी संघटित होण्याची गरज
एका बदलीने वणी पोलिस अॕक्शन मोडमधे
अवैध दारु विक्री व जुगार अड्यांवर कारवाई;
गाव इभ्रतीसाठी गावकऱ्यांनी संघटित होण्याची गरज
नाशिक -प्रतिनिधी
वणी पोलिसांनी कार्यक्षेत्रातील अवैध व्यवसायाचे कंबरडे मोडण्यासाठी धाड सत्र सुरु केले असून या धाड सत्रामुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे. खरं तर हे कारवाई झालेले हे अवैध धंदे चार दोन दिवसात सुरु झालेले नाहीत तर अनेक महिन्यापासून हे अवैध धंदे सुरु असताना आज धाड सत्राला मुहूर्त लागला, यामागे एका पोलिस उप निरीक्षकाचे असलेले लागेबांधे कारणीभूत असावेत, त्याच्या वाढदिवसाला पोलिस ठाण्यातच एका अवैध व्यवसायिकाची उपस्थिती प्रसार माध्यमांनी चव्हाट्यावर आणल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी केलेली कारवाई कारणीभूत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे वाढदिवसाचे हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासातच उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्याला दिलेली भेट, मध्यरात्रीच संबंधित पोलिस उप निरीक्षकाला नियंत्रण कक्षात हजर होण्यासाठी झालेले आदेश या साऱ्या बाबी अवैध धंद्याच्या मुळावर उठल्या.दुसऱ्या दिवशी सकाळी वाढदिवस साजरा करताना छायाचित्रात दिसणाऱ्या त्या एका अवैध व्यवसायिकाच्या धंद्यावर टाकलेला छापा, ही बाब एकूणच वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तमाम गावकऱ्यांसाठी अभिमान वाटावी अशीच आहे. वणी पोलिसांचे अशा कारवाईसाठी गावकऱ्यांनी अभिनंदन करण्यासाठी पुढाकार घेत असताना या नतद्रष्ट प्रवृत्ती शिरजोर होणार नाहीत यासाठी संघटित होण्याची गरज आहे.
………………..
वणी पोलिसांची कामगिरी :
Advertisement
वणी कोळीवाडा येथील लाकूड वखारी समोर पत्र्याचे टपरीमधे धाड टाकुन 1050 रुपयांच्या 15 सिलबंद देशी दारु प्रीन्स संत्रा नावाचे लेबल असलेल्या बाटल्या जप्त केल्या असुन दत्तात्रय अंबादास पवार रा.वणी यास नोटीस देण्यात आली आहे.दुसरी कारवाई पांडाणे येथे करण्यात आली आहे.भगवती नाष्टा सेंटरच्या पाठीमागे शेडच्या आडोशाला मोकळ्या जागेतुन 910 रुपयांच्या देशी दारु प्रिन्स संत्रा नावाच्या 13 बाटल्या जप्त करण्यात आल्या असुन भागवत वसंत शार्दुल रा.लहान उमराळे यांचेवर कारवाई करण्यात आली आहे तिसरी कारवाई जऊळके वणी येथील अन्नपुर्णा हाॕटेलचे पाठीमागे 840 रुपयांच्या 12 बाटल्या प्रिन्स संत्रा नावाचा देशी दारु जप्त करण्यात आला असुन सुनिल कैलास दवंगे याचेवर कारवाई करण्यात आली आहे. चौथ्या कारवाईत ओझरखेड येथील महीलेवर अवैध दारु विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली असुन 980 रुपयांचा प्रिन्स संत्रा देशी दारु जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या धडाकेबाज कारवाईनंतर सदर संशयीत अवैध दारु विक्री साठी दारु कोठुन खरेदी करतात याची चौकशी केली तर मोठे मासे गळाला लागतील.तसेच चिंचखेड परीसरात पोलिसांनी छापा टाकुन अवैध जुगार अड्यावर छापा टाकुन यशवंत श्रावण लिलके रा,वरखेडा ,ता,दिंडोरी तुषार पुरुषोत्तम पवार रा.वणी ,सुधाकर धोंडु चव्हाण रा पिंपळगाव बसवंत ,ता.निफाड ,व धनंजय साहेबराव जेवघाले रा.वडनेर भैरव ,ता.चांदवड यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,कल्याण नावाचा मटका अंकआकड्यांवर अवैधरीत्या लोकांकडुन पैसे घेऊन खेळताना व खेळविताना मुद्देमालासह संशयीतआढळुन आले.असुन चिंचखेड शिवारातील पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या भिंतीच्या लगत हाॕटेल दर्शन बिअर बार परमीट रुमच्या मागे प्लास्टीक शेडमधे सुरु असलेला मटक्याचा अड्डा पोलिसांनी उद्वस्त केला आहे.तर याच दर्शन बार समोर सार्वजनिक ठिकाणी खुलेआम सोरट नावाचा जुगार लोकांकडुन पैसे घेऊन खेळताना व खेळविताना संघटीत गुन्हेगारी कृत्य केल्याच्या आरोपावरुन सागर मनोहर मोरे रा.शिवरा.ता.निफाड ,राहुल ज्ञानेश्वर खैरनार रा,पिंपळगाव बसवंत,ता.निफाड ,उमेश लक्ष्मण जंगम उर्फ गोपीशेठ रा.वडनेर भैरव ,ता,चांदवड यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयीत यांचे अंग झडतीत प्लास्टीकचे बॕनर ,ज्यावर सुर्य ,कमळ,फुलापाखरु ,कबुतर ,दिवा वगैरे असे चिन्ह असलेले त्यावर बंद चिठ्यांचे बॕनर व अंगझडतीत 3020 रुपये जप्त करण्यात आले आहेत.दरम्यान वणी पोलिसांच्या कारवाईनंतर अवैध व्यावसायिक यांचे धाबे दणाणले साले तरी मुजोर व खाकीच्या संरक्षणाखाली सुरु असलेला गुटखा व्यावसायिक यांचा उच्छाद कमी होताना दिसत नाही.मोबाईलवर मटका व दुचाकीवर गुटखा असे प्रकार सर्रास प्रकार वणी शहरात सुरु असल्याची वंदता असुन वणी व कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय सुरु असतील तर त्याची माहीती पोलिसांना द्यावी असे आवाहन सपोनी सुनिल पाटील यांनी केले आहे.
……………..
पत्रकारांची बदनामी आणि दबाव तंत्र थांबवा:-
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. समाजातही चांगल्या वाईट प्रवृत्ती असतात.कधीकधी वाईट प्रवृत्तीवर प्रहार करताना कळत न कळत चांगल्या व्यक्तिमत्वालाही झळ सोसावी लागते. अर्थात या प्रक्रियेत सज्जन प्रवृत्तीला इजा पोहचावी हा उद्देश कुणाचाच असू शकत नाही. जे काम गावातील सज्जन प्रवृत्तीने करायला हवे ते काम त्यांना असलेल्या ज्ञात अज्ञात मर्यादेमुळे करू शकत नसतील तर प्रसार माध्यमे पुढे येतात. तेव्हा प्रसार माध्यमांच्या पाठीशी उभे राहण्याचे सत्कार्य या सज्जन प्रवृत्तीने करायला हवे. प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र दिसते. व्यवस्थेच्या पापावर बोट ठेवणाऱ्या पत्रकारितेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून, त्या पत्रकारितेची बदनामी करण्यासाठी, अशा पत्रकारितेची मुस्कटदाबी करण्यासाठी पीत पत्रकारितेला हाताशी धरले जाते. या कृतीने सज्जन प्रवृत्तीची प्रतिष्ठा,मान सन्मान वर्धित होतो असे नाही तर त्यातून खऱ्या पत्रकारितेचे खच्चीकरण होते. पीत पत्रकारिता बोकाळते. त्याचा फायदा समाजाला वेठीस धरणाऱ्या दुष्ट प्रवृत्ती घेतात. त्यांनी मांडलेल्या उच्छादामुळे समाज उध्वस्त होतो. आणि जेव्हा अवघा समाजच उध्वस्त होतो तेव्हा सज्जन प्रवृत्तीचे अस्तित्व कुठे शिल्लक राहते? याचे भान सज्जन प्रवृत्तीने प्रत्येक पाऊल उचलताना बाळगायला हवे.