ताज्या घडामोडी

मुंबईचा क्रिकेट संघ ठरला आमदार चषक प्रथम क्रमांकाचा मानकरी पारगावचा संघ द्वितीय मंचरचा संघ तृतीय तर मालदाड, घुलेवाडी संघ चतुर्थ


मुंबईचा क्रिकेट संघ ठरला आमदार चषक प्रथम क्रमांकाचा मानकरी

 

पारगावचा संघ द्वितीय मंचरचा संघ तृतीय तर मालदाड, घुलेवाडी संघ चतुर्थ

 

संगमनेर प्रतिनिधी 

 

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी आणि मालदाड पंचक्रोशीतील तरुणांनी आयो जित केलेल्या आमदार चषक २०२५ राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत देशमुख एंटरप्राइजेस, यांच्या मार्फत आलेला मुंबई येथील घोटेकर बी हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तर द्वितीय क्रमांक अभी दादा भांडलेपारगाव या संघाने, तृतीय क्रमांक एस के वॉरियर्स मंचर तर चतुर्थ क्रमांक छत्रपती वॉरियर्स मालदाड घुलेवाडी या क्रिकेट संघाने पटकविले

 

संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील कानिफनाथ क्रीडांगणावर ७ जून ते११ जून२०२५ या कालावधीत आमदार चषक २०२५ टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या क्रिकेट स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यातून १६ संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये सागर वर्पे, सुदर्शन देशमुख,सुधीर वाळे,राहुल राऊत,नवनाथ पानसरे जवळेकडलग आणि चिकणी यांनी आणलेला मुंबई येथील बी घोटेकर या क्रिकेट संघाला

Advertisement

प्रथम क्रमांकाचे अमोल खताळ युवा मंचच्या वतीने एक लाख रुपये रोख व डीलक्स मोटर सायकल देऊन गौरव करण्यात आला द्वितीय क्रमांकाच्या संघाला गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर स्वरूप राऊत यांच्या वतीने ७१ हजार रुपये रोख व इलेक्ट्रिक बाइक ,तृतीय क्रमांकाच्या संघाला भाजपचे निमोणचे सरपंच संदीप देशमुख व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच शिवसेनेचे सौरभ देशमुख यांच्या वतीने ५१ हजार रुपये रोख व स्पोर्ट सायकल तर चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर अनिल गोर्डे यांच्या कडून ३१ हजार रुपये रोख एलईडी टीव्ही असे बक्षिसे देण्यात आली .आमदार अमोल खताळ आणि इतर मान्यवरांच्या हस्ते चार ही संघांना करंडक देऊन गौरव करण्यात आला यावेळी निमोण सरपंच आणि भाजप उपाध्यक्ष संदीप देशमुख घुलेवाडी शिवसेना शाखा प्रमुख शरद पानसरे विलास राउत गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर अनिल गोर्डे, आकाश चकोर अजिंक्य वर्पे सौरभ देशमुख सुयोग गुंजाळ विनायक वाडेकर स्वप्निल राऊत, स्वरूप राऊत गणेश राऊत ,सोमनाथ पन्हाळकर सुनील नवले,दिनेश डगळे नितीन जोर्वेकर अनिल जोर्वेकर नितीन पानसरे रवींद्र वायकर बाबू राऊत ज्ञानेश्वर राऊत शुभम गव्हाणे शुभम पावसे, निखिल शेळके यांच्या सह घुलेवाडी व भालदाड परिसरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

चौकट

संगमनेर तालुक्यातील अनेक प्रतिभावंत खेळाडूंनी या तालुक्याचे नाव राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले आहे. परंतु, त्यांना संधी देण्याऐवजी त्यांना झाकण्याचा प्रयत्न करून अडथळे आणले गेले. मात्र आपण या खेळाडूंना खेळण्यासाठी एक चांगले व्यासपीठ निर्माण करून देऊ संगमनेरात खेळाडूंना खेळण्यासाठी चांगले प्रशस्त क्रीडांगण करण्यासाठी क्रीडा मंत्र्यांकडे पाठपुरावा करू. 

 अमोल खताळ

मतदार संघ संगमनेर विधानसभा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *