माजी खा.हरिश्चंद्र चव्हाणांची बंडखोरी अटळ* *भाजपला घरचा आहेर*,
*माजी खा.हरिश्चंद्र चव्हाणांची बंडखोरी अटळ*
*भाजपला घरचा आहेर*,
आज शक्ती प्रदर्शन करीत भरणार उमेदवारी अर्ज
नाशिक प्रतिनिधी
हेची फळ काय मम तपाला?,म्हणत मतदार संघातील जुन्या व एकनिष्ठ कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करून उमेदवारी अर्ज दाखल करनार असल्याचे मा, खा, यांनी आज जाहीर केले, तब्बल तीन वेळा प्रचंड मतांनी निवडून आलेले जिल्ह्यातील एकमेव खासदार अशी ओळख असलेले, भाजपचं सरकार अडचणीत असताना तबियत्तची पर्वा न करता व्हिल चेअर बसुन हेअर अब्ंलन्सने मतदान करनारे खासदार म्हणून सर्वांना परिचित असलेले आदिवासी नेते म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गांवा गांवा, अनिवासी वाढत्या वस्तीवर आपल्या विकास कामांचा ठसा उमटवून ओळख निर्माण केली आहे, एकीकडे दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू असतांना नाराज माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या बंडोखोरीवर शिक्का मोर्तब झाले आहे. येत्या 2 मे रोजी परशुराम सायखेडकर नाट्य गृहात सकाळी दहा वाजता हरिश्चंद्र चव्हाण यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे, बैठकीनंतर दिंडोरी लोकसभे साठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अनामत रक्कम भरणा करणे पासुन ते कायदेशीर बाबी पार पाडण्यात आल्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांना आज सूचना देण्यात आल्याचे हरिश्चंद् चव्हाण यांनी सांगीतले.
*विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत गेल्या महीना भरापासून लोकसभा मतदार संघातील शेतकरी बांधव, भाजपा कार्यकर्ते, विविध आदिवासी संघटना, पक्ष संघटना, विविध शेतकरी संघटना, बाबाजी भक्त परीवार, युवक संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपन हा निर्णय घेतल्याचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले,
ते या विषयावर अधिक माहिती देताना म्हणाले की,
अख्ख्या महाराष्ट्राने आणि देशाने माझी पक्षनिष्ठा बघीतली असल्याचे सांगून चव्हाण म्हणाले की दिंडोरी लोकसभा मतदार संघातील जनतेची सेवा करण्या ऐवजी शेतकऱ्यांना,लोकांना, कार्यकर्त्यांना दम दिला जातोय, कांद्याला भाव मागणाऱ्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दमबाजी केली जातेय,
*कुठे नेऊन ठेवला भाजपा?* असा उद्विग्न सवाल ही त्यांची शेवटी उपस्थित केला.
जनता माझ्या सोबत आहे
सत्ताधारी पक्षात असूनही शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नांवर आम्हीं लोकसभेत रान पेटऊन संपूर्ण निर्यात बंदी उठवली होती, आणि शेतकऱ्यांची न्याय बाजू मांडली होती. बळी राजाला कधी दम दिला नव्हता. जमिनी वरच राहिलो कधी सत्तेची हवा ( माज) डोक्यात जाऊ दिली नाही.. असे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण उंदिग्नेतुन सांगत होते. *शेतकऱ्यांसाठी अभी नहीं तो कभी नहीं*… *अशी साद घालत उमेदवारी माघारी साठी नाही तर विजयी होण्यासाठी करणारच* असा आशावाद व्यक्त केला.,,,