ताज्या घडामोडीसामाजिक

धामधूम लोकसभेची आणि कामगार दिनी जनतेची दुष्काळावर खमंग चर्चा            वेध जनतेला सामाजिक प्रश्नांचे


धामधूम लोकसभेची आणि कामगार दिनी जनतेची दुष्काळावर खमंग चर्चा

           वेध लागले जनतेला सामाजिक प्रश्नांचे

सिन्नर.

लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम ऐन बहरात असताना येथील तहसिलदार कार्यालयात दुष्काळ व सामाजिक प्रश्नांवर लक्ष वेधून घेणारी खमंग आणि लक्षवेधी चर्चा झाली.

 

निमित्त होते 1 मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे.  तहसिलच्या प्रांगणातील ध्वजारोहण आ.माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व

परिसरात उभारलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाला अभिवादन करून झाली.

समृध्द लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव व एक महामेळा म्हणुन लोकसभेच्या निवडणुकांनी देशभरात व महाराष्ट्रात जोर धरला आहे.. यामध्ये अनेक रंग व ढंग भरले असतांना यावरच गावातल्या पारापासून तर अगदी महानगरात पर्यंत चर्चा ही निवडणुकीतील साजुक तुपातील राजकारणावर होणे अपेक्षित आहे …असे असतांना जनतेच्या नाॅन इश्युवर चर्चा कशी होईल.. मात्र त्याला जागरूक सिन्नरकर अपवाद ठरले.

येथील तहसिलदार कार्यालयातील दालनात आ. माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत चहापान झाल्यावर ऊपस्थितांनी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ताकत दाखवून दिली.. तालुक्यातील शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळावर करायच्या उपाययोजना व शहरातील प्रमुख समस्यांवर ऊपस्थितांनी लक्ष वेधून घेतले.

Advertisement

महामित्र दत्ता वायचळे यांनी यवतमाळ शहरातील महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबनेबाबत शहरांतील पुतळ्याची सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला.. जे यवतमाळ घडु शकते ते ऊद्या इतरत्र घडणार नाही हे कशावरून ?…असा प्रश्न उपस्थित करून शहरातील महापुरुषांच्या पुतळे हे सी. सी टिव्ही च्या निगराणी खाली आणण्यासाठी आ.कोकाटे व मुख्याधिकारी रितेश बैरागी यांनी लक्ष घालावे.. त्यासाठी शासनाच्या नगरोत्थान व अन्य कुठल्याही निधीची तरतूद करण्यात यावी..अशी आग्रही मागणी केली… याबाबत तातडीने आचारसंहिता आटोपल्यावर तात्काळ प्रस्ताव तयार करण्याची सुचना मुख्याधिकारी बैरागी यांना आ.कोकाटे यांनी दिली.

तालुका दुष्काळ जाहिर झालेला असतांना प्रशासकीय पातळीवर उपाययोजनांचा दुष्काळ जाणवत आहेत.. पिण्याच्या पाण्याचे व पशुधनाच्या चारा व पाण्याचा प्रश्न आचारसंहितेत दुर्लक्ष होता कामा नये. तसेच यंदा पाऊस उशीरा झाला तर त्यादृष्टीने शासनाने बारमाही पाणी असलेल्या विहीरी अधिग्रहित कराव्यात. याकडे राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी शहराध्यक्ष नामदेवराव कोतवाल यांनी लक्ष वेधले.

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण व स्वच्छतेचा प्रश्न भिषण झालेला आहे. लोकांना पायी चालणे मुश्कील झाले आहे. याबाबत नगरपालिकेने ठोस भूमिका घ्यावी. अशी मागणी लायन्स क्लब चे माजी अध्यक्ष डॉ.विष्णु अत्रे यांनी केली.

डॉ.जी.एल पवार यांनीही शहरांतील भटक्या कुत्र्यांचा व मोकाट जनावरांचा प्रश्न उपस्थित केला.यावेळी ऊपस्थित केलेल्या प्रश्नांनावर नगर पालिकेने तात्काळ लक्ष घालुन कार्यवाही करा.असा सक्त सुचना कोकाटे यांनी दिल्या.

यावेळी झालेल्या चर्चेत रविंद्र काकड.माजी सैनिक मधूकर सोनवणे. विरपत्नी श्रीमती कमल वसंत लहाने. त्र्यंबक खालकर , सुधाकर यादव वामनराव ऊकाडे आदींनी सहभाग घेतला.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *