गंगापूर धरण भरण्याच्या मार्गावर; शहराच्या बगलेतील धरणेही तुडुंब
गंगापूर धरण भरण्याच्या मार्गावर;
शहराच्या बगलेतील धरणेही तुडुंब
नाशिक प्रतिनिधी
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल पासून जोरदार पाऊस असून, पावसाची संतत धार आजही कायम आहे.आज दिनांक ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता गंगापूर धरणातून एकूण विसर्ग ५०० क्यूसेस सोडण्यात येणार आहे. आणि दुपारी ३ वा. एकूण विसर्ग १००० क्यूसेस करण्यात येणार आहे.तसेच पावसचा जोर कायम असल्यास टप्या टप्याने एकूण विसर्ग वाढवण्यात येईल.
नाशिक शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या संतधार,पावसाने जिल्ह्यातील गंगापूर ८४ टक्के, मुकणे ५०
टक्के, दारणा ८८ टक्के, वालदेवी ९७ टक्के, काश्यपी ४६ टक्के, गौतमी गोदावरी ८० टक्के, पालखेड ७८, वाघाड ६० टक्के भरले तर गोदावरी नदीला शहरात सुरू असलेल्या पावसाने पहिला पूर आला असून दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आल्याने पूर पाहण्यासाठी नदी काठावर गर्दी उसळली आहे. सायखेडा आणि चांदोरी भागात नदीत असलेले मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे.आजही नाशिकला ऑरेंज अलर्ट असल्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान , दारणा धरणातून २२ हजार तर नांदूर मधमेश्वर धरणातून ३६ हजार क्यूसेक्सने नदीपात्रात विसर्ग सुरु आहे.