कार्यकर्त्यांच्या आग्रह व जनरेट्यामुळे उमेदवारी .. हरिश्चंद्र चव्हाण
दिंडोरी भाजपात अखेर बंडोखोरी हरिश्चंद्र चव्हाणांनी भरला उमेदवारी अर्ज
प. सा. नाट्य गृहातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय
कार्यकर्त्यांच्या आग्रह व जनरेट्यामुळे उमेदवारी .. हरिश्चंद्र चव्हाण
नासिक ( प्रतिनिधी )
दिंडोरी लोकसभा मतदार संघात भाजपा चे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी करत आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
प.सा.नाट्यगृह येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.कार्यकर्त्यांच्या आग्रह व जनरेट्यामुळे उमेदवारी केल्याचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले.
प.सा.नाट्यगृह येथील बैठकीस अखिल भारतीय आदिवासी बचाव संघटना चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.अशोक बागुल, आर पी आय जिल्हा अध्यक्ष विनोद जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती पोपटराव आहीरे, भाजपा देवळा येथिल पवन आहिरराव, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत वाघ, भाजपा सुरगाणा, दिंडोरीचे माजी तालुका अध्यक्ष संजू बाबा कावळे, लक्ष्मण जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ कलावती चव्हाण, वैभव कावळे, हनुमंत सानप, आनंद गावीत, माजी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष समिर चव्हाण, बापू पाटील,विनायक खालकर, संजय कानडे, यांच्यासह सुरगाणा, कळवण, दिंडोरी, पेठ, देवळा, चांदवड, येवला, नांदगाव, मनमाड, निफाड तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते.
भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना अनावर
दिंडोरी लोकसभा मतदार संघातील असंख्य कार्यकर्त्यांनी विद्यमान राज्य मंत्री भारती पवार यांच्या कामकाजा मुळे पक्ष रसातळाला गेल्याचे सांगितले. रक्त आटऊन दिंडोरी लोकसभा मतदार संघात भाजपा पक्ष वाढवला त्या हरिश्चंद्र चव्हाण यांच्यावर केवळ जनरेटा व शेतकऱ्यांसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली. परंतु १९९५ ची अपक्ष निवडणुक जिंकण्याची पुनरावृत्ती लोकसभेत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण करतील असा आशा वाद अनेकांनी बोलून दाखवला. सर्व आदिवासी संघटना माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या पाठीशी उभ्या ठाकल्याचे पदाधिकारी यांनी सांगितले.