मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट महिनाभरापासून निलाव बंद; उत्पन्नावर फिरले पाणी,शेतकरी राजा संकटात
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट
महिनाभरापासून निलाव बंद; उत्पन्नावर फिरले पाणी,शेतकरी राजा संकटात
मनमाड प्रतिनिधी:-
गेल्या वर्षी अल्प प्रमाणात पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी नियोजन करीत कांदा पिकवला खरा मात्र नैसर्गिक समस्यांची तोंड दिल्यानंतर मानवनिर्मित समस्या उभ्या राहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा कवडीमोल भावाने विक्री होत असून गेल्या काही दिवसापासून बाजार समित्यांमधील कांदा निलाव प्रक्रिया ठप्प झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. यात भर म्हणून लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा वाचा फोडण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे देखील वेळ शिल्लक नसला असून लोकप्रतिनिधी आपल्या प्रचारामध्ये व्यस्त असून शेतकरी मात्र वाऱ्यावर सोडला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार तरी कोण? त्यामुळे शेतकरी तसेच बाजार समितीवर अवलंबून असलेले कर्मचारी यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
दरम्यान बाजार समितीमधील व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी अनेक बैठका झाल्या मात्र अजूनही यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नसून शेतकरी राजा मात्र त्रस्त झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली असून मनमाडसह जिल्ह्यातील काही कांदा बाजार मागील ३० दिवसापासून बंद असून विविध सण उत्सव मार्च एंड तसेच लेव्ही देण्याच्या वादातून मापारी-हमाल यांच्या प्रश्नामुळे बाजारातील उलाढाल ठप्प झाली असून दुष्काळी परिस्थितीत कांदा असूनही शेतकऱ्यांना तो विक्री करता येत नसून कांदा विक्रीसाठी ने आण करणाऱ्या ट्रॅक्टर पिकप इतर वाहनांचा रोजगार देखील नाही, बाजार बंद झाल्याने उन्हाळा कांदा काढणीची काम रेंगाळली असून या प्रक्रियेतील शेतमजूर बेरोजगार झाले आहेत. एकूणच मनमाड शहर जिल्ह्यातील १५ बाजार समित्या उपबाजार समिती मधून होणारी खरेदी-विक्री बंद पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साधारण (७००) कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. जिल्ह्यात मनमाड, लासलगाव पिंपळगाव बसवंत व उमराणी या बाजार समित्यांमध्ये कांद्याची सर्वाधिक उलाढाल होते. रोज सरासरी १५ ते २० हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी येत असतो उर्वरित बाजार समिती त्यांच्या उपबाजारात रोज सरासरी सात ते दहा हजार क्विंटल कांद्याची खरेदी विक्री होते साधारण जिल्ह्यात दिवसाकाठी दीड लाख क्विंटल पेक्षा अधिक कांदा विविध बाजार समितीमध्ये विक्री करता आणला जातो मागील ३० दिवसांपासून सुमारे ३५ लाख क्विंटल कांद्याची खरेदी विक्री थांबली असून सध्या तापमान ४०° दरम्यान आल्याने कांदा खराब होण्याची भीती निर्माण झाली असून सन उत्सव लग्नसराई हंगाम सुरू आहे. कांदा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना कौटुंबिक खर्चासाठी देखील आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून कांदा लिलाव पूर्वत्र होण्यासाठी कुठल्याही हालचाली होत नसल्याने शेतकऱ्यांमुळे तीव्र नाराजी पसरली असून त्वरित कांदा निलाव सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे.
चौकट.
बाजार समिती सुरू करावी म्हणून आम्ही संबंधित मंत्री विभागाचे अधिकारी यांना भेटून विनंती केली असून मात्र अद्याप यामधून कोणत्याही प्रकारे तोडगा निघाला नसून समिती बंद असल्याने याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत असून शेतकरी हमाल मापारी यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांचे अतोनात हाल होत असून शेतकऱ्यांचं कामगारांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे व यावर त्वरित तोडगा काढावा ही मागणी जोर धरू लागली आहे.