हेमंत गोडसे यांच्या प्रचारावर सिन्नर शिवसेनेचा बहिष्कार सिन्नर तालुका शिवसेना पक्षाच्या बैठकीत ठराव
हेमंत गोडसे यांच्या प्रचारावर सिन्नर शिवसेनेचा बहिष्कार
सिन्नर तालुका शिवसेना पक्षाच्या बैठकीत ठराव
सिन्नर प्रतिनिधी
शिवसेनेने पुन्हा हेमंत गोडसे यांनाच नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी दिल्याने सिन्नर तालुका शिवसेनेत प्रचंड असंतोष उफाळून आला असून नाराज शिवसैनिकांनी गोडसे यांच्या प्रचारावर बहिष्कार टाकण्याचा ठराव केला आहे.
खा. हेमंत गोडसे हे पक्षापेक्षा स्वतःची प्रतिमा सांभाळण्यातच अधिक व्यस्त असून शिंदे गट शिवसेना पक्ष वाढीसाठी हेतुपूर्वक काम केले नाही.असा आरोप तालुकाप्रमुख शरद शिंदेपाटील व शिवसैनिक, पदाधिकारी यांनी केला आहे. स्थानिक शिवसैनिक पक्ष उभा करण्यासाठी धडपडत असतांना त्यांनी अडथळे आणले.हेमंत गोडसे यांच्या उदघाटन कार्यक्रमाच्या बॅनरवर
पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो टाकले नाहीत. भाजप शिवसेना पदाधिकारी यांना बोलावले नाही. उलट उबाठाचे वाजेंना बरोबर घेत त्यांचे फोटो टाकत उदघाटन केले.उबाठा पक्षास बळ दिले. भ्रष्टाचार केला,त्यांचे आक्षेपार्ह अश्लील व्हिडीओ फिरताहेत.मराठा आरक्षणाला विरोध केला.मराठा आंदोलन केले म्हणून कार्यकर्ते यांना छळले.अशा व्यक्तीला नासिकचा खासदार म्हणून उमेदवारी देऊ नये, अशी सिन्नर तालुका पदाधिकारी व शिवसैनिक पुरुष महिला यांची मागणी होती. त्यानुसार महिनाभर उमेदवारी थांबली.परंतु काल पुन्हा हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली गेल्याने सिन्नर तालुका शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक नाराज झाले आहेत.
तालुकाप्रमुख शरद शिंदे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी व शिवसैनिक यांनी तातडीने बैठक घेत पक्ष विरोधी,भ्रष्टाचारी,उबाठाप्रेमी हेमंत गोडसे यांचा प्रचार न करण्याचा ठराव पास करण्यात आला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर निष्ठा व प्रेम आहे. परंतु हेमंत गोडसे यांनी सिन्नर तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांना षडयंत्र करत त्रास दिलाय.पक्ष उभा करण्याची प्रक्रिया हाणुन पाडली .उबाठा पक्षाला बळ दिले.त्यामुळे हेमंत गोडसे यांना असहकार करण्याचा निर्धार करण्यात आला.पुढील दिशा ६ तारखे नंतर ठरवण्यात येणार असल्याचेही शिंदे म्हणाले.
तालुकाप्रमुख शरद शिंदेपाटील, शहरप्रमुख संदिप लोंढे, महिला ता.अध्यक्ष जयश्री गायकवाड संघटक शिवाजी गुंजाळ, जालिंदर लोंढे उपाध्यक्ष, गणेश जाधव उपाध्यक्ष,गटप्रमुख सुरेश सानप,रामबाबा शिंदे, गटप्रमुख राहुल रुपवते,रमेश लाड भाजीपाला अध्यक्ष,महेंद्र काकड उपशहराध्यक्ष, अमित शिंदे संघटक,निलेश चव्हाण उपशहराध्यक्ष, कैलास हिरे उपशहराध्यक्ष, मोरेताई शहराध्यक्ष, वराडेताई उपाध्यक्ष सह पदाधिकारी हजर होते.