१ जुलै पासून लागू होणाऱ्या नवीन कायद्याची सिन्नर पोलिस स्टेशन अंतर्गत जनजागृती..
१ जुलै पासून लागू होणाऱ्या नवीन कायद्याची सिन्नर पोलिस स्टेशन अंतर्गत जनजागृती..
सिन्नर प्रतिनिधी
देशासह राज्यभर नवीन कायद्याची अंमलबजावणी दि.१ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आली असून त्यानुसार नवीन कायद्या संदर्भात सिन्नर पोलिस स्टेशन अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार नुतन कायद्याच्याबाबत माहिती सांगण्यात आली.
सोमवार दि.०१ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वा.सिन्नर पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता,भारतीय नागरीक सुरक्षा संहिता तसेच भारतीय साक्ष अधिनियम २०२३ या नवीन कायद्याची आजपासून अंमलबजावणी होणार असल्याने जुने कायदे व नवीन कायद्या मधील बदल तसेच फरक व त्याबाबतची व्याप्ती समजावून जनजागृती करण्याचे अनुषंगाने सिन्नर पोलीस ठाणे मीटिंग हॉल येथे सकाळी ११ ते १२ या वेळेत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
यावेळी डॉ.निलेश पालवे,उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड उपविभाग, सिन्नर न्यायालयातील सरकारी अभियोक्ता श्री सुनील जोरवर ,वकील संघटनेचे अध्यक्ष श्री जयसिंग सांगळे, अनेक वकील ,प्रतिष्ठित नागरिक,पोलीस पाटील व पो.स्टे.कडील पो.अधिकारी,अंमलदार उपस्थित होते.