पुस्तकी शिक्षणासोबत व्यवहारी शिक्षण महत्वाचे :किरणकुमार चव्हाण व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार संपन्न
पुस्तकी शिक्षणासोबत व्यवहारी शिक्षण महत्वाचे :किरणकुमार चव्हाण
व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार संपन्न
नाशिक प्रतिनिधी
पुस्तकी शिक्षणासोबतच जगण्याचे कौशल्य शिकवणारे व्यवहारी शिक्षण देखील आपल्या पाल्याला मिळाले पाहिजे याची खबरदारी प्रत्येक पालकाने घ्यावी. पुस्तकी शिक्षण जेव्हढे महत्वाचे तेव्हढेच किंबहुना त्याही पेक्षा व्यवहार ज्ञान अधिक महत्वाचे आहे ,असा मोलाचा सल्ला पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिला. व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हा तसेच शहर कार्यकारिणीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे,राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले ,प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के ,प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर,उत्तर महाराष्ट्र प्रमुख डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनात पत्रकार स्नेह संमेलन तसेच पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता.त्याप्रसंगी ते बोलत होते.या सोहळ्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सायं दैनिक नायकचे संपादक गोरक्ष मदने हेही उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील 20 गुणवंत पाल्यांचा तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल पत्रकार पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पालक पत्रकारांना संबोधित करताना पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी पत्रकारितेसारखा व्यस्त आणि गंभीर जबाबदारीचा व्यवसाय सांभाळून देखील पाल्य शिक्षणात आघाडीवर असतात ,हे खरे तर कौतुकास्पद आहे.पालक पाल्याच्या शिक्षणाबाबत जेव्हढे जागृत आणि सजग आहेत तेव्हढीच काळजी त्यांनी आपल्या पाल्याला व्यवहार ज्ञानात पारंगत करण्यासाठी घ्यायला हवी. संकटाना सामोरे जाण्याचे धाडस पाल्यामध्ये निर्माण करा.संकटाला सामोरे गेल्याशिवाय प्रतिकार क्षमता आणि उपाय क्षमता विकसित होत नाही शिक्षण महत्वाचे असले तरी व्यवहार ज्ञान आणि संकटाला तोंड देण्याचे धाडस निर्माण झाल्याशिवाय आजच्या जगात तरणोपाय नाही. असे प्रतिपादन केले.
हाच धागा पकडून गोरक्ष मदने यांनीही संयुक्त कुटुंब पद्धती लयास गेल्याने व्यवहारी ज्ञानाचे संस्कार दुरापास्त झाले आहेत .आजी आजोबांच्या संस्कारी गोष्टीची जागा मोबाईल नावाच्या खेळण्याने घेतली.त्यातून कुटुंबातील संवाद संपला आहे ही बाब लक्षात घेऊन पालकांनी स्वतःपासून सुधारणा घडवून आणायला हवी असे सांगितले.
जिल्हाध्यक्ष कुमार कडलग यांनी व्हॉईस मीडियाची ध्येय धोरणे तर शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी स्नेह संमेलनाचे प्रयोजन विषद केले.महानगर सचिव हेमंत काळमेख यांनी आभार प्रदर्शन केले.विठ्ठल भाडमुखे यांनी सूत्र संचालन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष सुधीर उमराळकर,सरचिटणीस देवानंद बैरागी,मायकल खरात , अश्विनी पुरी, रश्मी मारवाडी,सुनीता पाटील ,मोहसीन पठाण संजय परदेशी,सचिन गायकवाड ,नितीन ओस्तवाल आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुधीर उमराळकर यांनी ज्योतिष शास्री पदवी प्राप्त केल्या बद्दल पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला .