आश्रम शाळेतील विद्यार्थिनी शी असभ्य वर्तन… आरोपीला अटक
आश्रम शाळेतील विद्यार्थिनी शी असभ्य वर्तन…
आरोपीला अटक
अकोले :-
तालुक्यातील तिरडे आश्रमशाळेत विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षक आणि त्याला मदत करणाऱ्या शिक्षिका, मुख्याध्यापिकेसह शिपायाविरोधात अकोले पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी भाऊराव धुपेकर याला अटक करण्यात आली आहे.
पीडित विद्यार्थिनी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून दोन वर्षांपूर्वी वसतिगृहात असताना आठवीच्या वर्गात शिक्षक भाऊराव राया धुपेकर हे तासिका संपल्यानतर वर्गांत यायचे व सतत तिच्यासह मैत्रिणींसोबत बोलण्याचा प्रयत्न करायचे. एकेदिवशी जेवणाची सुट्टी झाली असताना धुपेकर वर्गात आले व पीडिता मैत्रीणींसह बाकावर बसलेल्या असताना ते तिला म्हणाले, काय करत आहेस ? त्यानंतर बोलणे टाळण्याकरीता ती दुसऱ्या बाकावर जाऊन उभी राहिली असता धुपेकर यांनी गैरकृत्य केले, तसेच तिची मैत्रीण (वय १७) तिच्याशीही गैरकृत्य करत दुसऱ्या मुलीस बोलेले की माझे पाठ खाजवूनू दे व हात पाय दाबून दे. त्यानंतर सर्वानी मिळून मुख्याध्यापिका कुलथे यांच्याकडे जाऊन सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यावेळी त्या म्हणाल्या, तुम्हाला माझी शपथ आहे घरी हा प्रकार सांगू नका. त्यानंतर धुपेकरांची दुसऱ्या शाळेत बदली झाली, याचबरोबर शिक्षिका गभाले या नेहमी मुलांच्या नावाने चिडवून त्रास देत असे. त्यानंतर ती नववीमध्ये शिक्षण घेत असताना जेव्हा जेव्हा शाळेच्या आवारात तसेच वसतिगृहात फिरत असताना साफसफाई कामगार धांडे मामा पाठलाग करायचे व कपडे धूवत असताना देखील जवळ उभे राहायचे. असे प्रकार सारखेच सुरु झाल्याने पुन्हा घडलेला सर्व प्रकार मुख्याध्यापिका कुलथे यांना सांगितला असता त्या म्हणाल्या की, जर झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुम्हाला शाळतून कादून टाकू अशी धमकी दिली
Advertisement
हा सर्व प्रकार घरी सांगितला तर घरचे बोलतील या भीतीमुळे कोणतीच घटना घरी सांगितली नाही. त्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत धांडे मामा यांची देखील बदली झाली. तेव्हा दहावीला गेल्यानतर मुख्याध्यापिका तिला सतत कोणत्या न कोणत्या कारणावरुन बोलू लागल्या व मानसिक त्रास देवू लागल्या, सदरचा मानसिक त्रास सहन न झाल्याने आश्रमशाळेतील मोबाईल फोनवरुन आईला कॉल केला व गेल्या २ वर्षांपासून घडलेला सर्व प्रकार आई-वडीलांना सांगितला. पालक व संबंधित पीडित मुली पोलिस ठाण्यात आल्या. त्यांनी दिलेल्या जबाबावरून चौघावर अकोले पोलीस ठाण्यात गु. र. न 362/2025 नुसार बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम 8, 12,17 भारतीय न्याय संहिता कलम 75(2),(4), 74, 351 (2) प्रमाणे श्री. धुपेकर सर, धांडे मामा मुख्याध्यापिका कुलथे मॅडम, गभाले मॅडम यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस तपासी अंमलदार पोसई खांडबहाले हे करत आहे.



