सिन्नर पोलिसांच्या कर्तुत्वाला सिन्नरकरांची दाद ; प्रहार जनशक्तीच्या वतीने पोलिसांचा केला सत्कार
सिन्नर पोलिसांच्या कर्तुत्वाला सिन्नरकरांची दाद ;
प्रहार जनशक्तीच्या वतीने पोलिसांचा केला सत्कार
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
सिन्नर प्रतिनिधी
सिन्नर शहर आणि तालुक्याची कायदा सुव्यवस्था अलीकडच्या काळात सिन्नर पोलिसांनी प्रसंगोचित कारवाया केल्याने सिन्नरकरांच्या मनातील दहशत दूर झाली असून पोलिसांविषयी आदराची भावना निर्माण झाली आहे. हाच आदर व्यक्त करण्यासाठी सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पोलिसांचा सत्कार करून त्यांच्या परिश्रमाला दाद दिली आहे.
मागील 10 वर्षात सिन्नर शहराचा चेहरा मोहरा सतत बदलत आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे सिन्नर शहराच्या आसपास वाढत जाणारे औद्योगिकरण व त्यामुळे वाढणारी प्रचंड लोक संख्या तसेच नाशिक शहरापासूनचे अत्यंत जवळचे अंतर, सिन्नरच्या हद्दीतून जाणारा शिर्डी आणि समृद्धी महामार्गामुळे प्रवासाची वाढलेली गती यामुळे गुन्ह्यांच्या प्रमाणात स्वाभाविकपणे वाढ होत आहे.मागील साधारण १० महिन्यांपासून चैन स्नॅचिंग, घरफोडी, मोटार सायकाल चोर, बतावणी करून फसवणारे ठग अशा गुन्हेगारांच्या अशांच्या मुसक्या आवळण्यात सिग्नर पोलीस यशस्वी ठरले आहेत.
त्यातच गेल्या ८ तारखेला शहरातील गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर शहरात अनामिक दहशत पसरली होती. तथापी कुठलाही दुवा नसताना देखील सिन्नर पोलिसांनी जिल्हा पोलिसांच्या सहकार्याने तातडीने पाऊले उचलून काही तासात गोळीबार करणाऱ्या संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे निर्माण झालेली दहशत काही प्रमाणात का होईना कमी होण्यास मदत झाली.याशिवाय रोज दाखल होणाऱ्या छोट्या मोठ्या गुन्ह्यांच्या तपासात देखील सिन्नर पोलिसांचे काम प्रगती पथावर आहे. त्यांचा हा उत्साह असाच कायम राहावा, यासाठी त्यांच्या परिश्रमाला दाद देत प्रहार जन शक्ती पक्षाच्या तालुका शाखे तर्फे पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड,प्रहार जन शक्तीचे तालुका अध्यक्ष कैलास दातीर, शहर कार्याध्यक्ष गणेश थोरात, सामाजिक कार्यकर्ते खंडेराव सांगळे आदी उपस्थित होते.