आरोप :हिंदुत्ववादी नेत्याविरोधात कपटी डाव? महिला डॉक्टरच्या माध्यमातून रामसिंग बावरी यांना अडकवण्याचा प्रयत्न! पोलिस आयुक्तांनी घेतली दखल
आरोप :हिंदुत्ववादी नेत्याविरोधात कपटी डाव?
महिला डॉक्टरच्या माध्यमातून रामसिंग बावरी यांना अडकवण्याचा प्रयत्न!
पोलिस आयुक्तांनी घेतली दखल
नाशिक : प्रतिनिधी
हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि हिंदुत्ववादी नेता रामसिंग बावरी यांच्यावर एका महिला कंत्राटी डॉ. नाहिल खतीब यांच्या माध्यमातून खोटे आरोप लावून बदनामी करण्याचा आरोप काही संघटनानी केल्याने खळबळ उडाली आहे. एक वृद्ध व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर आढळल्याने बावरी यांनी तत्काळ माणुसकीच्या नात्याने 108 वर कॉल करून रुग्णवाहिका बोलावली. पण त्यानंतर जे घडले, ते अंगावर शहारे आणणारे आहे.या संदर्भात हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे.
या संपूर्ण प्रकाराची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या समाज कंठकांवर सुद्धा कारवाई करावी यासाठी सकल हिंदू समजा व हिंदू एकता आंदोलन पक्षाचे समर्थकांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन दिले.
बावरी समर्थकांकडून संबंधित डॉक्टरविरोधात चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
त्याचबरोबर हिंदुत्वाचा आवाज दाबण्यासाठी केलेले हे पद्धतशीर कटकारस्थान आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
यावेळी सकल हिंदू समाज व हिंदू एकता आंदोलन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कंत्राटी महिला डॉक्टरचा उद्धटपणा – सेवा नव्हे, अरेरावी!:
रुग्णवाहिका वेळेवर न येणे, आणि आल्यावर ‘में क्या संपूर्ण द्वारका फिरूं का?’ असा उद्धट सवाल विचारणे हेच अपमानकारक होतं. पण खरी कहाणी पुढेच सुरू झाली. कंत्राटी डॉ. नाहिल खतीब नावाच्या महिलेने बेवारस रुग्ण घेतला जाणार नाही असे म्हणत जखमी वृद्धाला पुन्हा रुग्णवाहिकेतून खाली उतरवले. बावरी यांनी यावर आपला रुग्ण सेवा धर्म विसरले का? असे सांगून माणुसकीने सेवा करा असा सल्ला दिला, तेव्हा सदर डॉक्टरने शिवीगाळ, धक्काबुक्की देत पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकीबाजी देत कळस गाठला.
कर्तव्यावरील कसूर, अन खोट्या तक्रारीचा प्रयोग!
या कंत्राटी डॉ. नाहिल खतीब यांनी नुसती सेवा नाकारलीच नाही, तर खोटे आरोप करून बावरी यांना अडकवण्याचा डाव रचला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी सर्व प्रकार पाहिला असून डॉक्टरने कोणतीही वैद्यकीय मदत न देता उलट धमक्या दिल्या, हे स्पष्ट आहे. बावरी यांनी तत्काळ सिव्हिल सर्जन यांना फोन करून दुसरी रुग्णवाहिका मागवली, पण तोपर्यंत एक तासाचा अमूल्य वेळ वाया गेला.असा आक्षेप रामसिंग बावरी आणि घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शीनी घेतला आहे.
घटनेनंतरचा सापळा:
घटना घडल्यानंतर दिवसभर नाट्यमय घटना घडल्याची चर्चा आहे. घटना सकाळी घडली. आणि महिला डॉक्टरने सायंकाळी गुन्हा दाखल केला. दरम्यानच्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्याची चर्चा आहे.त्यानंतरच रामसिंग बावरी यांना अडकविण्यासाठी सापळा लावला.
यामागे षडयंत्र असल्याचा गडद संशय नाशिकमधील सामाजिक संघटना व्यक्त करीत आहेत. डॉक्टरच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यात झालेल्या गर्दीतील काही चेहरे १६ ऑगस्टच्या दंगलीत तसेच सात पीर दर्गा प्रकरणात पोलिसांवर दगडफेक करणारे आरोपी होते.असा गंभीर आरोप सामाजिक संघटना करीत आहेत. याची सखोल चौकशी व्हायला हवी. नाशिक शहराचा सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी या प्रकरणाची मुळापासून चौकशी व्हायला हवी.
एकवटलेल्या हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप:
१०८ या रुग्णवाहिकेसोबत असलेल्या कंत्राटी महिला डॉक्टर डॉ. नाहील खतीब यांनी वृद्धाला वैद्यकीय सेवा देण्याऐवजी, “क्या मैं पूरी द्वारका घूमूं क्या?” असं उद्धटपणे उत्तर दिलं… आणि वृद्धाला रुग्णवाहिकेतून उतरवलं असं प्रत्यक्षदर्शिचं म्हणणं आहे.
जेव्हा बावरी यांनी “माणुसकीने वागा” असं सांगितलं, तेव्हा त्या डॉक्टरने थेट शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली आणि पोलिसात खोट्या तक्रारीची धमकी दिली.हे प्रकरण धमकीवरच थांबलं नाही, तर समाजातील काही मंडळींना एकत्र करून दबाव तंत्राचा वापर करीत रामसिंग बावरी यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हाही दाखल केला असे प्रत्यक्षदर्शी म्हणतात.
सामाजिक कामात सातत्याने अग्रेसर असलेले रामसिंग बावरी यांना अडकविण्यासाठी षडयंत्र करून हा सारा प्रपंच रचला गेल्याचे लक्षात आल्यानंतर संतप्त नागरिक आणि बावरी समर्थकांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. डॉ. नाहील खतीब व चालक सागर कदम यांच्याविरोधात BNS कलम 352, 351(2), 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकारामागे बावरी यांना अडकवण्याचा सुनियोजित कट असल्याचा आरोप समर्थकांनी लावला आहे.
या डॉक्टरविरोधात पूर्वीही अनेक तक्रारी असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे…
हिंदुत्वाचा आवाज दाबण्यासाठी हे षड्यंत्र रचले जात आहे का?
सत्य काय आहे हे समोर यावं, हीच जनतेची मागणी आहे.