आदिवासींचा कळवळा की सत्तेच्या मस्तीचा बाजार? “वर राम, आत रावण, आणि सोबत भाडोत्री बँडबाजा”!
आदिवासींचा कळवळा की सत्तेच्या मस्तीचा बाजार?
“वर राम, आत रावण, आणि सोबत भाडोत्री बँडबाजा”!
अकोल्यात एकनाथ शिंदे आले, या क्रांती भूमीवर त्यांचा पाय पडताच महायुतीचे पाय मात्र थरथरू लागल्याचे लक्षण दिसायला लागले. सभा काय होती, कार्यक्रम काय होता, हे सगळं हे सगळं काही वेळासाठी बाजूला ठेवा, तिथं झालेलं प्रकार बघून गावकरी म्हणतात, “राजकारणाचं हाटच भरलं होतं.”
डीजेचा तडका; “आपलाच भाऊ?” “आपल्यालाच धडा?”
शिंदे भाषण सुरू करतात, तेवढ्यात डीजेचा आवाज कानठळ्या बसवेल असा वाढवला जातो.
नेते विचारतात, “आपलाच भाऊ आहे का?”
गावकुसावर बसलेला एक जण हसून म्हणाला, “हो, भाऊ तर आपलाच… पण आता त्याचं बोलणं ऐकायचं नाही, म्हणून डीजे लावला.”हे काही विरोधक नव्हते, स्वतःचेच नाराज कार्यकर्ते होते.
पोलिसांशी धक्काबुक्की – सत्ता की गुंडगिरी?
डीजे थांबवायला गेलेले पोलीस, ते काही गावातले चौकीदार नव्हते, त्यांनाही थेट धक्काबुक्की, दमदाटी, त्यांच्या कर्तृत्वबाणा दाखवणाऱ्या छातीवर दिमाखात विराजमान असलेली नेमप्लेट तोडणं इथपर्यंत या गुंडा गर्दीची मजल गेली.
लोकं म्हणतात, “हा कार्यक्रम राजकारणाचा की रांगडा तमाशा?”शेवटी पोलिसांनाच लाठीचार्ज करावा लागला.या सत्ताधारी गर्दीची मुजोरी एव्हढी शिगेला गेली की सत्ताधाऱ्यांच्याच मेळाव्यातच पोलीसांना बिनधास्त मार खावा लागतो.
भाडोत्री गर्दी: आदिवासी दिन की ठेका मेळावा?
हा जागतिक आदिवासी दिन म्हणे! पण मंचर, ओतूर, जुन्नर, सिन्नर, पारनेरमधून चिरीमिरी देऊन गर्दी आणली.
शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ तर थेट बोलूनच गेले,
“भोळ्या-भाबड्या आदिवासींच्या अज्ञानावर तवा ठेवून महायुती राजकीय पोळी भाजतेय.” एका म्हाताऱ्याने ऐकलं आणि म्हणाला, “अहो, कार्यक्रम आदिवासींचा, पण भाषणं सत्ताधाऱ्यांची,मग फायदा कुणाचा?”
रावण समर्थकांचा जल्लोष – ‘रामाचे उपासक आता ‘रावणा’बरोबर
मिरवणुकीत रावण संघटनेचा सहभाग पाहून अकोलेकरांनी टाळ्या पिटल्या… उपरोधाच्या!
“रामाचं नाव घेऊन गादी मिळवायची, आणि आता रावणाबरोबर नाचायचं, हे नवं राजकारण बुवा भारीच!”
आरएसएस-बीजेपी गप्प. गावकऱ्यांचा सरळ सवाल “जर हा कायदाभंग असेल, तर गुन्हा दाखल का झाला नाही? की आपल्या माणसाला सगळं माफ?
गटबाजीचा तमाशा: एक , दोन, आता तीन गट!
अजित गटाचे आमदार लहामटे सरळ म्हणतात,“भविष्यात शिंदे समर्थकांना त्यांच्या जागी बसवू.”
गावातल्या चौकात कोणीतरी म्हणालं, “अरेरे! अजून निवडणूकच लागली नाही, आधीच गटात गट पडले!”
गावकुसावरचे प्रश्न:
👉 आदिवासींच्या नावाखाली भाडोत्री गर्दी जमवणं – हा अपमान नाही का?
👉पोलिसांवर धक्काबुक्की – ही लोकशाही आहे का गुंडशाही?
👉‘राम’च्या नावावर सत्ता मिळवून ‘रावणा’बरोबर नाचणं – हे ढोंगीपण नाही का?
👉आरएसएस-बीजेपी गप्प का?
लोकबोलीतील भावना :
अकोलेचा प्रकार म्हणजे “वर राम, आत रावण, आणि सोबत भाडोत्री बँडबाजा”.
महायुतीला ही इशारापत्रिका आहे, लोक सगळं पाहतायत, ऐकतायत, आणि योग्य वेळी हिशेब चुकते करतील.
👉 या सगळ्यात आदिवासी समाजाच्या श्रद्धेला कुठेही ठेच पोहोचवायचा प्रश्न नाही,हेतूही नाही,कारण रावण हा त्यांचा देव, त्यांचा सांस्कृतिक वारसा आहे. परंतु, त्या भावनांच्या पार्श्वभूमीवरही आपण सत्ताधाऱ्यांच्या दुहेरी मापदंडांना दुर्लक्षित करू शकत नाही.क्रमश: