क्राईम

मुरबाड मध्ये सामाजिक उपक्रमांतर्गत शिलाई मशीनचे वाटप! शेकडो अनुयायी उपासक दीक्षा घेणार !  मुरबाडमध्ये २६ डिसेंबर रोजी पादुका दर्शन सोहळा!


मुरबाड मध्ये सामाजिक उपक्रमांतर्गत शिलाई मशीनचे वाटप! शेकडो अनुयायी उपासक दीक्षा घेणार !

 मुरबाडमध्ये २६ डिसेंबर रोजी पादुका दर्शन सोहळा!

 

☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

मराठी संस्कृतीचे जतन करा 

……………………………………………………………………………..

बाळासाहेब भालेराव / मुरबाड

अंनत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांनी दिलेल्या ‘तुम्ही जगा,दुसऱ्याला जगवा’ या शिकवणीतून स्व-स्वरूप संप्रदाय, जिल्हा ग्रामीण ठाणे भक्त सेवा मंडळाच्या वतीने जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुका दर्शन व गुरुपूजन सोहळ्याचे भव्य आयोजन मुरबाड नगरीत येत्या गुरुवार २६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजल्यापासून कुणबी समाज हॉल साजईफाटा, मुरबाड येथे करण्यात आले आहे.

या पादुका दर्शन सोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ज.न.म. संस्थानाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत गोरगरीब, गरजू महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. तरी या महनमंगल प्रसंगी आपण सहकुटुंब, सहपरिवार, इष्टमित्र,आप्तेष्टांसह या आध्यात्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहून पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा असे विनम्र आवाहन स्व-स्वरूप संप्रदाय जिल्हा ग्रामीण ठाणे भक्त सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

स्वरूप संप्रदाय जिल्हा ग्रामीण ठाणे भक्त सेवा मंडळांतर्गत कल्याण,डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड आदी तालुका परिसरात घरोघरी पादुका दर्शन सोहळ्याचा प्रचार-प्रसार शिगेला पोहोचला आहे. हजारोच्या संख्येने भक्त,साधक,शिष्यांच्या सहभागाने अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका आलिशान रथात आरुढ करून मुरबाड शहरातून कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत सुश्राव्य भजन, नाम गजर, मंगल वाद्यांचा सूरताल , भगव्या पताका, पारंपारिक वेशभूषा, टाळ मृदुंगांच्या वाद्यात भजनी पथके, कलशधारी स्त्रिया, निषाणधारी, विविध कला नृत्य, काही क्षण देखावे, रस्त्यांच्या दुतर्फा रांगोळ्या, लेझीम, फुगड्या व पारंपारिक नृत्य अशा विविध अंगाने नटलेल्या या पालखी मिरवणुकीत असंख्य भक्त, साधक, शिष्यांचा मेळा सहभागी होऊन पादुका दर्शन सोहळ्यात सन्मिलित होणार आहे.

Advertisement

मुरबाड नगरीत २६ डिसेंबर रोजी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या पुरोहितांकडून वेदोक्त मंत्रोच्चारात सिद्ध पादुकांच्या पूजनानंतर शेकडो अनुयायींना उपासक दीक्षा दिली जाणार आहे. त्यानंतर संस्थानाकडून प्रवचन सेवा, भजन सेवा होणार आहे, आलेल्या सर्व भाविक भक्तगणांना महाप्रसादाची व्यवस्था स्व-स्वरूप जिल्हा ग्रामीण ठाणे भक्त सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. हिंदू धर्म संस्कृतीत पादुका दर्शनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाची ही परंपरा असल्याने तुमच्या कुलदेवतेचे ही स्मरण करत, पादुकांची पूजा करताना प्रत्यक्ष श्री सद्गुरुना स्पर्श होत असल्याने एक सात्विक आनंद मिळतो. तुम्ही काही मागितले नाही तरी परमपूज्य सद्गुरु मात्र जे योग्य तेच देतात, तुमचे अनेक प्रश्न मार्गी लागतात, संकटे आली तरी त्यातून तरून जाण्याची शक्ती प्राप्त होते. तुमच्या चित्ताला एक प्रकारे समाधान लाभते. अशा असंख्य जनाना आलेल्या अनुभूतीने अनेक पिढ्यांची ही पादुका दर्शन परंपरा भारत वर्षात सुरू आहे. त्यास अनुसरून दक्षिणकाशी रामानंदाचार्य पिठाचे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्य सिद्ध पादुका दर्शनाचा सोहळा गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेने सुरू असल्याचे ठाणे जिल्हा ग्रामीण निरीक्षक मनोज परब, जिल्हा अध्यक्ष अरविंद कासले, सामाजिक उपक्रम प्रमुख अविनाश शिरोशे,तालुकाध्यक्ष भरत सासे,उत्सव समिती अध्यक्ष नारायण आगिवले , प्रसिद्धी प्रमुख अशोक नाईक यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *